ICHMH51NEWS.IN
9921600800

आमदार ‘मुख्य निवडणूक आयुक्त’ झालेत काय? – शशांक बावचकर 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार ‘मुख्य निवडणूक आयुक्त’ झालेत काय? – शशांक बावचकर 

इचलकरंजी
“आमदार राहुल आवाडे आता ‘मुख्य निवडणूक आयुक्त’ झालेत काय?” असा खोचक प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी उपस्थित केला आहे. इचलकरंजीतील एका कार्यक्रमात आमदार राहुल आवाडे यांनी पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार असल्याचे विधान केले होते. या विधानावर जोरदार टीका करताना बावचकर म्हणाले की, “कोणत्याही अधिकृत घोषणेशिवाय केलेले हे वक्तव्य म्हणजे जनतेची दिशाभूल आहे. मतचोरी व गैरप्रकारांवर पडदा टाकण्यासाठी अशा घोषणा केल्या जात आहेत. आधी आपल्या विधानसभा निवडणुकीत काय घडले याचे आत्मपरीक्षण करावे.”

पाणी प्रश्नावर हल्लाबोल करताना बावचकर यांनी स्पष्ट केले की, सहा जलकुंभ व पंचगंगेचे बळकटीकरण करून पाणीटंचाई भूतकाळ ठरेल, हा दावा हास्यास्पद आहे. ही घोषणा म्हणजे शासनमान्य सुळकुड योजनेला बगल देण्याचे कारस्थान असल्याचे त्यांनी म्हटले. “दोन वर्षांपूर्वी दसऱ्याच्या कार्यक्रमात रोज पाणी देण्याची घोषणा केली होती, त्याचा हिशेब कुठे आहे?” असा थेट सवालही त्यांनी केला.

आगामी महापालिका निवडणुकीबाबत बोलताना बावचकर म्हणाले की, महाविकास आघाडीचे नेतृत्व सक्षम असून उमेदवार ठरवण्याची जबाबदारी त्यांची आहे. भाजपने याची चिंता करू नये. लोकशाही व्यवस्थेवर महाविकास आघाडीचा विश्वास आहे. काही घटनात्मक संस्था सत्तेला बळी पडल्या असल्या तरी जनतेचा निर्णयच अंतिम ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेवटी बावचकर यांनी आमदार आवाडेंना इशारा दिला की, “खोट्या विकासाच्या भूलथापा देऊन जनतेची दिशाभूल करणे थांबवा. शहरातील मूळ प्रश्न सोडवा आणि महानगरपालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार रोखण्याचे धाडस दाखवा. जनता फसवणूक सहन करणार नाही.”

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा