आपटे वाचन मंदिर येथे शिक्षक गौरव सोहळा संपन्न
इचलकरंजी
आपटे वाचन मंदिर इचलकरंजी येथे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. समारंभाचे प्रमुख पाहुणे विलिंग्डन महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर, सांगली यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आजच्या शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अध्यापन करण्याची गरज विषद केली. त्यांनी त्याचप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात.प्रा.डॉ. त्रिशला कदम (कन्या महाविद्यालय, इचलकरंजी).प्रा. श्री. साजिद मणेर (दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी), सौ. प्राची कुलकर्णी (डी. के. टी . ई. इंटरनॅशनल स्कूल, तारदाळ),सौ. सुरेखा कुंभार (विद्या मंदिर, लोकमान्य नगर, कोरोची),सौ. रंजना घोरपडे (मुसळे बाल विद्या मंदिर, इचलकरंजी). यांना गौरवण्यात आले.
Advt
यावेळी सत्कारमूर्तींनी आपटे वाचन मंदिराच्या पुरस्काराने आम्हाला कार्य करण्यास प्रेरणा लाभली आणि आमची जबाबदारी ही वाढली आहे असे उदगार मनोगतात व्यक्त केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुणे प्राचार्य डॉ. ताम्हनकर यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. काशिनाथ जगदाळे यांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक ग्रंथालयाच्या अध्यक्ष सौ सुषमा दातार यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी करून दिली. आभार प्रदर्शन सहकार्यवाह प्रा. डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ मीनाक्षी तंगडी व प्रा. डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी केले. या कार्यक्रमात संचालक श्री. राजेंद्र घोडके, सौ. हर्षदा मराठे, कु. माया कुलकर्णी, सत्कारमूर्तींचे कुटुंबीय, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त विविध संस्थांतील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







