९ ऑक्टोबरच्या राज्यव्यापी संपासाठी चालकांचा निर्धार – डॉ. बाबा कांबळे यांचे इचलकरंजीत आवाहन
इचलकरंजी (प्रतिनिधी) : “कंपन्यांची मनमानी आणि सरकारचे दुर्लक्ष आता खपवून घेणार नाही. आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागेल,” असे प्रतिपादन ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केले. ते इचलकरंजी येथे झालेल्या जनजागृती सभेत बोलत होते.
९ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या राज्यव्यापी संपाच्या तयारीसाठी सुरू असलेल्या दौऱ्यादरम्यान इचलकरंजीत रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांनी ढोल-ताशांच्या गजरात डॉ. कांबळे यांचे स्वागत केले. शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत शेकडो वाहनधारक सहभागी झाले.
Advt
डॉ. कांबळे म्हणाले, “बेकायदेशीर बाईक टॅक्सीमुळे रोजगार धोक्यात आला आहे, ओला-उबेरसारख्या कंपन्या चालकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत, आणि शासनाने दिलेली कल्याणकारी महामंडळाची आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे ९ ऑक्टोबरचा बंद ऐतिहासिक करावा.”
या वेळी व्यासपीठावर IFEVa चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजीव मिश्रा (दिल्ली), ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट श्री. निवास येरोपोटो (तामिळनाडू), पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ पाटील, महाराष्ट्र फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल बम्मन्नावर, महाराष्ट्र कृती समिती इचलकरंजी अध्यक्ष संजय येलाज, फेडरेशन नेते बल्लूर स्वामी, मन्सूर सावनूरकर, मुन्ना चौधरी, सचिन मस्के, अल्ताफ शेख, राजू आवळे, खालील हिप्परगी, शाहीर जावळे, राजु माळगे, दीपक जाधव, कयूम जमादार, सुनील गायकवाड, रामा कांबळे, इराण्णा गोलसंगे, समीर नांदेवाले, खाजा चौधरी, सलीम तांबोळी, इम्रान बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
संपामागील प्रमुख मागण्या म्हणजे मुक्त परवाना पद्धत रद्द करणे, बेकायदेशीर बाईक टॅक्सी बंद करणे, चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे आणि सीएनजी टेस्टिंग फी कमी करणे या आहेत.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मल्लिकार्जुन बिल्लुर यांनी केले.
संप यशस्वी करण्याचा निर्धार करताना चालक प्रतिनिधी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







