डी.के.ए.एस.सी.कॉलेज मार्फत पुरबाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इचलकरंजी:
येथील दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मार्फत सोलापूर जिल्ह्यातील के. एन. भिसे आर्टस्, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, भोसरे महाविद्यायातील पुरबाधित शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
पुरबाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणेची संकल्पना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी मा. श्री कौस्तुभ गावडे यांच्या विचारातून आमलात आणण्यात आली. हा उपक्रम राबवण्याविषयी मा.श्री.कौस्तुभ गावडे यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.
Advt
प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील एन.एस.एस., एन.सी.सी. व सांस्कृतिक विभागामार्फत इचलकरंजी शहरातील विविध विभागात विद्यार्थ्यांनी पुरबाधित विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत गोळा केली. या बरोबरच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ही सढळ हाताने आर्थिक मदत दिली. यातून साठ हजार इतकी भरीव मदत गोळा झाली. यातून प्रत्येक विद्यार्थ्याला एक सॅक, अर्धाडझन मोठ्यावह्या, पेन पेन्सिल, कंपास इतके शैक्षणिक साहित्य सीना नदीच्या पुरामध्ये वाकव, ल्हावे, पापसन, साडे इ. गावातील शंभर पुरबाधित विद्यार्थी-विद्यार्थिनींना देण्यात आली.
या प्रसंगी माढा एज्युकेशन संस्थेचे सचिव मा. श्री बाळासाहेब भिसे, महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी डॉ.सुनिल भोसले (एन . एस . एस . प्रकल्प अधिकारी )यांनी आपल्या मनोगता मध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेविषयी व डी.के.ए.एस. सी. कॉलेजच्या सामाजिक उपक्रमांची माहिती सांगितली . पुढे नैसर्गिक आपत्ती व विविध संकट समयी एकमेकांना मदत करणे याविषयी सर्वांनीच पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. हे सांगत असताना समाजातील विविध उदाहरणे दिली. यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव झाल्याचे दिसून आले. याबरोबरच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री. बाळासाहेब भिसे यांनी अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्ती विषयी माहिती सांगून दोनशे पंचवीस किलोमीटर इतक्या दूरवर असणाऱ्या डी.के. ए. एस. सी. कॉलेजने पुरबाधित विद्यार्थ्यांच्यासाठी केलेल्या मदतीविषयी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सुरु असलेले कार्य हे महाविद्यालयाच्या विविध उपक्रमातून दिसून आले. एकूणच सामाजिक बांधिलकीच्या अनुशंगाने सर्वांनी अशी प्रेरणा घेणे महत्त्वाचे आहे असे मत मांडले.
Advt
हा उपक्रम उच्च शिक्षण विभागाच्या परिपत्रकातील सूचना नुसार राबविण्यात आला.याप्रसंगी एन. एस. एस. प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल भोसले यांचे सोबत महाविद्यालयातील प्राध्यापक प्रो. (डॉ.) सुभाष जाधव, प्रा. दिगंबर नागर्थवार, प्रा निलेश जाधव, प्रा. संदीप पाटील व श्री. अर्शद पाथरवट अनेक मान्यवर व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
पुरबाधित भागात शालेय साहित्य वाटप करताना डिकेएएससी कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







