इचलकरंजीत आज आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडीची विजयी संकल्प सभा; बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती
इचलकरंजी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इचलकरंजी येथे “विजयी संकल्प सभा” आयोजित करण्यात आली.सभा आज सकाळी १० वाजता थोरात चौक येथे पार पडणार आहे.
या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक संदीप देसाई यांची विशेष उपस्थिती राहणार असून दोन्ही पक्षांचे सर्व उमेदवार यामध्ये सहभागी होणार आहेत.
या संकल्प सभेत शहरातील स्थानिक प्रश्न, सामाजिक न्याय, विकासाचे आराखडे तसेच आगामी निवडणूक रणनीती यांवर पक्ष नेते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. इचलकरंजी परिसरातील कार्यकर्ते व नागरिकांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







