सामाजिक प्रश्नांना वृत्तपत्र पत्रलेखनातून न्याय मिळतो.-अभिजीत पटवा यांचे प्रतिपादन
इचलकरंजी:
सामाजिक प्रश्नांना वृत्तपत्र पत्रलेखनातून वाचा फोडून न्याय मिळतो असे मत ज्येष्ठ पत्रकार अभिजीत पटवा यांनी दत्ताजीराव कदम आर्ट्स , सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मध्ये पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र पत्रलेखन कार्यशाळे प्रसंगी व्यक्त केले . सदर पत्रलेखन कार्यशाळा ही मराठी विभाग , समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी , वृत्तपत्र पत्र लेखक संघ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने घेण्यात आली .
अभिजीत पटवा पुढे म्हणाले की, वृत्तपत्र क्षेत्रात करिअरच्या खूप संधी आहेत . याची सुरुवात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी मनामध्ये ठेवून करावी समाजातील लहान-मोठे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रातून पत्रलेखन केले पाहिजे यातून समाज जागृती होऊन समाजसेवा केल्याचे समाधान मिळते . हे सांगत असताना त्यांनी स्वतःच्या जीवनात शिक्षण घेत असताना आपण कसे वृत्तपत्र क्षेत्रात लेखन केले आणि नंतरच्या काळात पत्रकारितेची पदवी घेऊन वार्ताहर कसे झालो याच ज्वलंत उदाहरण देत विद्यार्थ्यांना पटवून सांगितले . वृत्तपत्र केवळ माध्यम नाही . सोशल मीडियाचा प्रभाव वृत्तपत्रावर होतो आणि वृत्तपत्राचा प्रभाव समाजावर होत असतो . आज ८० टक्के भाग सोशल मीडियाने व्यापला आहे . समाजात न्यायाची क्रांती करण्यासाठी आणि अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सुरू केले . आज या क्षेत्रात खूप मोठी क्रांती झालेली दिसते . पत्र लेखनाच्या माध्यमातून स्व :मत मांडले जाते . पत्रलेखन हा सामाजिक क्रांतीचा पाया आहे जागरूक नागरिक घडविण्याचे कार्य वृत्तपत्रच करू शकते असेही ते पुढे म्हणाले .
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब राजमाने यांनी पत्रकारितेच्या विविध पैलूवर प्रकाश टाकत पत्रकारिता किती महत्त्वाची आहे हे सांगितले . पत्रकारितेमध्ये लिहिण्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज आहे यावर त्यांनी प्रकाश टाकत वाचन , श्रवण , चिंतन व लेखन या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे मत मांडले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर (डॉ ) एस .के . खाडे यांनी समाजातील लोकशाहीचा वृत्तपत्र हा चौथा आधारस्तंभ असल्याचे मत मांडले .याच वृत्तपत्रातून आजची शिक्षण व्यवस्था कशी कमकुवत होत चाललेली आहे यावर प्रकाश टाकण्याची गरज आहे . समाजाचे यासंबंधी प्रबोधन करणे हे वृत्तपत्राचे महत्त्वाचे कार्य आहे भविष्यात विद्यार्थ्यांनी वृत्तपत्राच्या क्षेत्रात सजगतेने उभे राहून समाज घडविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे .असेही मत प्राचार्य डॉ. खाडे म्हणाले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. (डॉ .) सुभाष जाधव यांनी केले . याप्रसंगी प्रसाद कुलकर्णी , पांडुरंग पिसे , ऋषिकेश राऊत , मनोहर जोशी, महेंद्र जाधव, रमेश सुतार, जतीन पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते . सर्वांचा विवेक अंक व बुके देऊन सत्कार करण्यात आला .
या कार्यशाळेसाठी विविध वृत्तपत्राचे वार्ताहर तसेच डॉ . प्रियांका कुंभार डॉ .सुनील भोसले श्री निलेश जाधव आदी मान्यवर सहाय्यक प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी , सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार श्रीमती भारती कोळेकर यांनी मानले .
पत्रलेखन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना अभिजित पटवा,व्यासपीठावर प्रा एस के खाडे,प्रसाद कुलकर्णी, पांडुरंग पिसे,बाबासाहेब राजमाने
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






