ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रभाग ९ मध्ये शिव शाहू विकास आघाडीच्या प्रचारास उस्फुर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रभाग ९ मध्ये शिव शाहू विकास आघाडीच्या प्रचारास उस्फुर्त प्रतिसाद

इचलकरंजी:
 येथील श्री वेताळ मंदिरात प्रभाग क्रमांक ९ मधील शिव-शाहु विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या उमेदवारांना भागाभागात प्रचार फेरीला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी अनेकांनी कप-बशीलाच मतदान करण्याचा निर्धार केल्याचे बोलून दाखवत उमेदवारांना विश्वास दिला.
            प्रभाग क्रमांक ९ मधुन राहुल खंजिरे, अब्राहम आवळे, संतोषी कांबळे आणि रोहिनी बरकाळे हे शिव-शाहु विकास आघाडीकडुन महापालिकेची निवडणुक लढवत आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार राजू आवळे, शिव-शाहु आघाडीचे नेते शशांक बावचरकर, संजय कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर महालक्ष्मी मंदिर, कोरवी गल्ली, विठ्ठल मंदिर, नारायणनगर यासह भागाभागातून प्रचार फेरी काढण्यात आली. फेरीच्या माध्यमातून नागरीकांशी थेट संवाद साधला जात असून नागरीकांचा फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. यावेळी अनेकांनी कप-बशीलाच मतदान करण्याचा निर्धार केल्याचे बोलून दाखवत उमेदवारांना विश्वास दिला.
वेताळ मंदिर ची पुजारी श्री बजरंग काटकर श्री मधुकर वाळकुंजे नजरुद्दीन मोमीन प्रकाश राव अक्कीवाटे सुभाष अकीवाटे सलीम मोमीन बाबू पनोरी आनंदा वाळकुंजे दत्ता वाळकुंजे असलम बागवान अण्णासो भंडारे अशोक खुडे चंद्रकांत तडाके चंद्रकांत बेळगीकर बाळकृष्ण ढवळे प्रमुख उपस्थित होते
प्रचाराचा शुभारंभ करताना माजी आ.राजुबाबा आवळे,मा आ.राजीव आवळे व उमेदवार
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा