महासत्ता चौकात बुलडोझर,अतिक्रमणे हटवली
इचलकरंजी
*इचलकरंजी महानगरपालिके कडून रस्ता रुंदीकरण करणेस अडथळा निर्माण होत असलेले महासत्ता चौक येथील सर्व अतिक्रमण हटविले*
इचलकरंजी शहरातुन सांगली शहरास जोडणारा मुख्य रस्त्यावरील महासत्ता चौक या ठिकाणचे रस्ता रुंदीकरण करणेचे काम सदर ठिकाणी काही व्यावसायिकांनी केलेल्या आतिक्रमणामुळे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होते.
या ठिकाणी वाहतूकीस अडथळा निर्माण होवुन बरेच वेळा अपघाताच्या घटना घडलेल्या असल्याने सदर रस्त्याचे रुंदीकरण करणेची मागणी शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध मान्यवरांनी वेळोवेळी महानगर पालिका प्रशासनाकडे केलेल्या होत्या.
या अनुषंगाने आज गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त प्रसाद काटकर आणि उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या नियंत्रणा खाली महासत्ता चौक येथील अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविणेत आली.
आजच्या मोहिमेत महासत्ता चौक येथील रस्ता रुंदीकरण करणेकामी बाधीत होत असलेली सर्वच खोकी हटविणेत आलेली आहेत.
त्याचबरोबर रस्त्यावर केलेले कंपौंडचे अतिक्रमण हटवुन सदर ठिकाणी रस्ता सपाटीकरण करणेचे काम महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने सुरू करणेत आलेले आहे.
आजच्या मोहिमेत
शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर,सहा. संचालक नगररचना प्रशांत भोसले, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे,उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर, सहा नगररचनाकार हरिश्चंद्र पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, तसेच अतिक्रमण आणि आरोग्य विभागाकडील कर्मचारी सहभागी झाले होते.
तसेच या मोहिमेसाठी महानगर पालिकेकडील मक्तेदार नरेश नगरकर, नितिश पाटनी, ज्योतीराम बरगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा.
मनसेचे रवी गोंदकर यांनी पत्र देऊन अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या पत्रानुसार अतिक्रमणधारकांना नोटीस काढण्यात आली,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी मोर्चाचे नियोजन केले तर माजी नगरसेवक अमरजीत जाधव तसेच राजु आलासे यांनी नुकसानभरपाई स्वरूपात टीडीआर देण्यासाठी प्रयत्न केल्याने हा प्रश्न कायमचा मार्गी लागला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









