महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न
इचलकरंजी
महानगरपालिका मा.महासभा व विविध समित्या स्थापन झालेल्या आहेत. मा. महासभा विविध विषय समित्यांच्या अधिकार मर्यादेनुसार संचिका सादर करणेबाबत तसेच सद्यस्थितीत प्रशासकीय कामकाजाची प्रक्रिया कशी करावी याबद्दल माहिती देणेसाठी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी कर्मचारी यांचेसाठी मार्गदर्शन शिबिर आज शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे आयोजित केले होते.
यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना समजेल अशा सोप्या आणि सुलभ पद्धतीने महानगरपालिका प्रशासकीय कामकाजाची प्रक्रिया समजावून सांगितली. याचबरोबर अधिकारी कर्मचारी यांना प्रशासकीय कामकाज करताना येत असलेल्या अडचणी समजून घेऊन सदर अडचणींचे कशा प्रकारे निराकरण करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मा. महासभा व इतर समित्यांचे अधिकार मर्यादेनुसार मा. महासभा / संबंधित समित्यांची मान्यता आवश्यक असलेस तशा नस्ती स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर होणे आवश्यक असल्याचे नमूद करत याप्रमाणे कार्यवाही करावी असे आवाहन यावेळी मार्गदर्शन शिबिराचे प्रशिक्षक तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सहा. आयुक्त विजय राजापुरे यांनी केले.
या प्रशिक्षण शिबिरास उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, शिक्षण अधिकारी बी.एम. कासार, सहा.आयुक्त रोशनी गोडे यांचेसह सर्व सहा. आयुक्त, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना नंदू परळकर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





