क्रांतीदिनी काँग्रेसची प्रभातफेरी
इचलकरंजी
क्रांती दिनाच्या निमित्ताने इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पहाटे इचलकरंजी कमिटी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कॉं.मलाबादे चौक ते महात्मा गांधी पुतळा ते हुतात्मा स्मारक, गांधी चौक प्रभातफेरी काढण्यात आली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर,इचलकरंजी शहर कॉंग्रेस अध्यक्ष संजय कांबळे व कॉंग्रेस नेते राहुल खंजीरे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सर्व कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रांतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हुतात्म्यांना अभिवादन
इचलकरंजी
आज महात्मागांधी पुतळा येथील पुरवठा कार्यालय मध्ये असणाऱ्या क्रांती स्तंभाजवळ अभिवादन करताना, आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या वीरांना मनःपूर्वक आदरांजली अर्पण केली. त्यांच्या बलिदानांनीच आपल्याला स्वतंत्रता मिळाली आहे आणि त्यांच्या स्मृतींनी आपल्याला राष्ट्राच्या सेवेसाठी झटण्याची प्रेरणा दिली आहे.
ऑगस्ट क्रांती दिन हा आपल्याला स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी एकजुटीने उभं राहण्याची शिकवण देतो.१९४२ साली या दिवशी, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली चळवळ ही आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठीचा निर्णायक क्षण होता. या दिवशी, त्याग, बलिदान आणि देशभक्तीच्या तेजस्वी धड्यांचा स्मरण करणे हीच खरी श्रद्धांजली आहे.
यावेळी मदन कारंडे, शहर अध्यक्ष सुहास जांभळे, महिला अध्यक्षा सौ. माधुरी सातपुते वहीणी, युवक अध्यक्ष अभिजित रवंदे, संतोष पाटील, शिवाजी शिंदे, विठ्ठल चौगुले, गैबान भाभी, नागेश शेजाळे, सुनिल भोंगटे, पोपट देडे, आनंदा कांबळे, संदीप कारंडे, अनिल पाटील, पप्पु लोंढे, गजानन सावंत, विनोद गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ताराराणी पक्षाच्या वतीने क्रांतिदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन
इचलकरंजी ता. ताराराणी पक्षाच्यावतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे आणि ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृती स्तंभ तसेच महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन देशभरात साजरा केला जातो. येथील पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणात स्मृती स्तंभ असून त्या स्तंभास क्रांती दिनी ताराराणी पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सतिश मुळीक, महावीर कुरुंदवाडे, शेखर शहा, श्रीरंग खवरे, दीपक सुर्वे, बाबासाहेब पाटील, नरसिंह पारीक, चंद्रकांत पाटील, श्रीकांत टेके, राहुल घाट, पांडुरंग सोलगे, शैलेश गोरे, संजय केंगार, शिवाजी काळे, सर्जेराव पाटील, मोहन काळे, चंद्रकांत इंगवले, अशोक पुजारी, भारत बोंगार्डे, मुरारजी देसाई, सुभाष जाधव, किशोर पाटील, संजय आरेकर, बंडोपंत लाड, राजेंद्र बचाटे, राजू माळी, रमेश पाटील, अनिल शिकलगार, अरुण निंबाळकर, सर्जेराव हळदकर, नजमा शेख, सीमा कमते, सपना भिसे, अनिल बमण्णावर, राजू पुजारी, राजू दरीबे आदींसह आवाडे समर्थक, ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त शहरातील पुरवठा कार्यालय येथील हुतात्मा स्मृती स्तंभास आणि महात्मा गांधी
यांच्या पुतळ्यास महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त प्रसाद काटकर आणि उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करणेत आले.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा.विजय राजापुरे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, शाहु हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पोवार, सदाशिव शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, क्रीडा अधिकारी संजय शेटे, प्रशांत आरगे, विजय पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, अविनाश रंगाटे, महेश बुचडे, सचिन शेडबाळे, मनोज खंदारे, दिलीप मगदूम आदींसह राजर्षी शाहू हायस्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800