ICHMH51NEWS.IN
9921600800

आंबेडकर जयंतीनिमित्त वीरशैव कक्कया डोहर समाजाचा शैक्षणिक उपक्रम; ६५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आंबेडकर जयंतीनिमित्त वीरशैव कक्कया डोहर समाजाचा शैक्षणिक उपक्रम; ६५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण

इचलकरंजी  :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वीरशैव कक्कया डोहर समाजाच्या वतीने ६५ गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्यांचे वितरण करून विधायक पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. यावेळी पैलवान अमृतमामा भोसले, नगरसेवक सुनील तेलनाडे, नगरसेविका स्मिता तेलनाडे, नगरसेवक सुशांत कलागते, नागेश पाटील, संतोष शेळके, राजू पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच पैलवान विजय जाधव, शशिकांत चौधरी, चंद्रकांत कदम, संजय सोनवणे, वंदना जाधव, युवराज कदम, राजू सोनवणे, राहुल जाधव, अजय जाधव, सचिन जाधव, दीपक जाधव, हरीश सोनवणे, सौरभ जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी वंदना जाधव, लता खंदारे, श्रुती कदम, सुनिता कटके, सोनाली जाधव, नंदा पोळ, वैजयंता जाधव, शोभा जाधव, चंद्राबाई पोळ उपस्थित होत्या.
समाजाच्या या शैक्षणिक उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

वह्या वितरण करताना नगरसेविका स्मिता तेलनाडे,सुनील तेलनाडे,,सुशांत कलागते,अमृता भोसले व मान्यवर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा