ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत १६ एप्रिलला ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत काँग्रेसची बैठक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत १६ एप्रिलला ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत काँग्रेसची बैठक

इचलकरंजी :
मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ची अंमलबजावणी महाराष्ट्रातही सुरू झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यात हे अभियान १३ एप्रिल ते १८ एप्रिलदरम्यान राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने झारखंडचे काँग्रेस नेते जयशंकर पाठक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते जिल्ह्यातील विविध ब्लॉक काँग्रेस कमिटींना भेट देऊन संघटनात्मक आढावा घेणार असून, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यावर भर देणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर जयशंकर पाठक हे दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीला भेट देणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटना बळकट करण्यासाठी त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून समन्वयक म्हणून सचिन सावंत, राहुल गायकवाड आणि नंदकुमार कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातील सर्व जुन्या व नवीन काँग्रेस कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा