ICHMH51NEWS.IN
9921600800

‘संविधान चौक’ उभारणीसाठी आम आदमी पक्षाचे निवेदन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘संविधान चौक’ उभारणीसाठी आम आदमी पक्षाचे निवेदन

इचलकरंजी :
भारतीय संविधानाच्या मूल्यांचा प्रचार-प्रसार आणि नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने (आम आदमी पक्ष) यांच्या वतीने शहरात ‘संविधान चौक’ उभारण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर महासत्ता चौक येथे ‘संविधान चौक’ निर्माण करण्याबाबत इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
महानगरपालिका आयुक्त तसेच महापौर उदय धातुंडे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात, हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक नसून संविधानिक मूल्यांचे जतन व प्रसारासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संविधान चौक उभारल्यास नागरिकांना त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव होण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या सहभागातून तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा कडक इशाराही आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष वसंत कोरवी, उपाध्यक्ष यशवंत भंडारे, रावसो पाटील, माजी अध्यक्ष प्रकाश सुतार, बाबुराव माळी, अब्दुल बस्ताडे, मोजेस आवळे, शब्बीर शिरोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर व आयुक्त यांना निवेदन देताना आम आदमी पक्षाचे पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा