महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी सभा मुंबईत पार; इचलकरंजीचे महापौर उदय धातूंडे यांचा सहभाग
मुंबई
मुंबई येथे महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी सभा माननीय सौ. रितू तावडे (महापौर, बृहन्मुंबई महानगरपालिका व अध्यक्ष, परिषद) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला कार्याध्यक्ष रंजीत चव्हाण तसेच लक्ष्मण लटके यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यातील बहुतांश महापौरांनी परिषदेत सहभाग नोंदवला असून इचलकरंजीचे महापौर उदय धातूंडे यांनीही सक्रिय उपस्थिती दर्शवली.
सभेमध्ये महापौरांचे अधिकार, कामकाजातील अडचणी, तसेच महानगरपालिकेच्या कार्याची माहिती घेण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. निधीअभावी येणाऱ्या अडचणी आणि विविध कार्यपद्धतींवरही विचारमंथन झाले.
परिषद अध्यक्षांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी परिषद उपाध्यक्ष पदासाठी नागपूरच्या महापौर सौ. नीता ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. परिषदेत महापौरांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय व निधीअभावी अडचणींसह शहर विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
महापौर परिषदेत मत मांडताना इचलकरंजीचे महापौर उदय धातूंडे यावेळी उपस्थित रितू तावडे व इतर महापौर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





