ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत जनगणना २०२७ प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण; ५११ प्रगणक, ८७ पर्यवेक्षक सज्ज

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत जनगणना २०२७ प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण; ५११ प्रगणक, ८७ पर्यवेक्षक सज्ज

इचलकरंजी:
 भारताची जनगणना २०२७ पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील प्रगणक व पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराचा दुसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. शहरासाठी एकूण ४९६ गणना ब्लॉक्स निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान घरगणना होणार आहे.
या कामासाठी महापालिका क्षेत्रात ५११ प्रगणक व ८७ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन टप्प्यांत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून २७ ते २९ एप्रिल हा पहिला, २ ते ४ मे हा दुसरा आणि ६ ते ८ मे हा तिसरा टप्पा राहणार आहे.
डी.के.ए.एस.सी. महाविद्यालय, श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, डीकेटीई इंग्लिश मीडियम हायस्कूल व बालाजी हायस्कूल येथे १० फील्ड ट्रेनरमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. स्लाइडशोच्या माध्यमातून सैद्धांतिक माहिती दिल्यानंतर सहभागी प्रगणक व पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष घरभेटी देऊन प्रात्यक्षिकही केले.
यावेळी उपायुक्त नंदू परळकर, सहायक आयुक्त रोशनी गोडे, तसेच इतर अधिकारी व समन्वयक उपस्थित होते. दरम्यान, १ ते १५ मेदरम्यान नागरिकांसाठी स्वयंगणनेची सुविधा उपलब्ध असून https://se.census.gov.in⁠ या पोर्टलवर माहिती भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा