ICHMH51NEWS.IN
9921600800

महिलांसाठी डीकेटीईचा कौशल्यविकास उपक्रम; प्रशिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी-माजी मंत्री प्रकाश आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांसाठी डीकेटीईचा कौशल्यविकास उपक्रम; प्रशिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी-माजी मंत्री प्रकाश आवाडे

इचलकरंजी:

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन, कल्लाप्पाणा आवाडे टेक्निकल पार्क आणि डीकेटीई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला विव्हर एअरजेटलूम प्रशिक्षण’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यासाठी डीकेटीईमध्ये आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाला ४०० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. कौशल्याधारित प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही सामाजिक बांधिलकी असून हा उपक्रम महिलांना आत्मनिर्भर व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यास मदत करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षण प्रमुख विकास लोहार यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. १३ ते १९ जूनदरम्यान डीकेटीईमध्ये सैद्धांतिक प्रशिक्षण, तर २० जूनपासून केएटीपी पार्क, तारदाळ येथे महिनाभर प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक रॅपीअर, एअरजेट व इतर ऑटो लूम ऑपरेशनचे प्रशिक्षण मिळणार आहे.
यावेळी कार्यकारी संचालक रवी आवाडे, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, प्रा. डॉ. यु. जे. पाटील, नगरसेविका सपना भिसे यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजक व मान्यवर उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा