ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थिनी व पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थिनी व पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

इचलकरंजी :
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ सोमवार दि. १ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी दहावी बोर्ड परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच इयत्ता दहावीच्या प्रत्येक तुकडीत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा श्रीमंत गंगामाईचे स्कूल कमिटीचे चेअरमन मारुतराव निमणकर आणि संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यवेक्षक एस. एस. कोळी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले तसेच दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाचे वाचन केले. सत्कारप्रसंगी गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त करत प्रशालेने दिलेल्या शैक्षणिक मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मार्गदर्शन करताना विश्वस्त अहमद मुजावर यांनी विद्यार्थिनींना भविष्यातही कठोर परिश्रम, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर यश संपादन करून आपल्या पालकांचे, शाळेचे आणि शहराचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए.एस.काजी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एम.गरड यांनी केले, तर जी. पी. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
गुणवंत विद्यार्थीनीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा