ICHMH51NEWS.IN
9921600800

मतदारांच्या दारी शिवसेना; पुनर्निरीक्षण अभियानासाठी कार्यकर्त्यांना झोकून देण्याचे आवाहन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मतदारांच्या दारी शिवसेना; पुनर्निरीक्षण अभियानासाठी कार्यकर्त्यांना झोकून देण्याचे आवाहन

इचलकरंजी :
 आगामी मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करा, असे आवाहन शिवसेना निवडणूक विभागप्रमुख प्रशांत घोरपडे व अविनाश सणस यांनी केले.
इचलकरंजीतील मराठा मंडळ भवन येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या बीएलए पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी केले होते.
प्रशिक्षणादरम्यान मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचून माहिती द्यावी, असे घोरपडे यांनी नमूद केले. २००२ व २०२४ च्या मतदार याद्यांतील नोंदींची पडताळणी, नव्या मतदारांची नोंदणी आणि आवश्यक दुरुस्त्यांसाठी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
रवींद्र माने यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अभियान महत्त्वाचे असल्याचे सांगत शिवसैनिकांनी वेळ काढून काम करावे, असे आवाहन केले. शिवसेनेने विकसित केलेले विशेष ॲप प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
सुमारे चार तास चाललेल्या या शिबिरास लोकनियुक्त नगराध्यक्ष अजितसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे, डॉ. सावर्डेकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा