वीजदरसवलती बद्दल पॉवरलूम असोसिएशनतर्फे राज्य सरकारचे आभार
इचलकरंजी
आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यंत्रमाग ग्राहकास प्रती युनीट २० किलो व्हॅट म्हणजे २७ एच.पी. आतील वीज ग्राहकास १ रुपये व २० किलो व्हॅट २७ एच.पी. वरील यंत्रमाग ग्राहकास ७५ पैसे इतकी वीज दर सवलतीसाठी ऑनलाईन नोंदनीची अट शिथील करण्याचा निर्णय करणेत आला.
दि. १५ मार्च २०२४ रोजी २७ एच.पी. खालील यंत्रमागधारकांना अतिरिक्त १ रुपयेची सवलत व २७ एच.पी. वरील यंत्रमागधारकांना अतिरिक्त ७५ पैशांची सवलतीचा शासन निर्णय झाला होता. परंतु सदरची सवलत मिळणेसाठी ऑनलाईन नोंदणीची अट घालणेत आली होती. या ऑनलाईन नोंदणीमधील जाचक अटींमुळे नोंदणी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करणे गरजेचे होते.
आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यंत्रमागधारकांची ऑनलाईन नोंदणी करणेची अट शिथील करणेत आली. याचा फायदा आता इचलकरंजीतील २७ एच.पी. खालील ७१६५, आणि २७ एच.पी. वरील २५८६ यंत्रमाग ग्राहकांना मिळणार आहे. या निर्णयामुळे फक्त इचलकरंजीच्या २७ एच.पी. खालील यंत्रमाग ग्राहकांचे लाईट बिलापोटी प्रती महिना २ कोटी १४ लाख व २७ एच.पी. वरील यंत्रमाग ग्राहकांचे ६ कोटी म्हणजे दोन्ही मिळून एकुण ८ कोटी रुपये इतकी बचत होणार आहे. तर वार्षिक १०० कोटी इतकी बचत होणार आहे.
या मंत्रीमंडळ निर्णय प्रक्रियेसाठी मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर सचिव मा.विकास खारगे यांचे सहकार्य लाभले आहे. त्यासर्वांचे आभार दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मानले आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800