ICHMH51NEWS.IN
9921600800

महापालिका वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिका वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर रोड येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी उपायुक्त नंदू परळकर व माजी सभापती मनोज साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीचा शुभारंभही करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त शहर आणि नागरिकांमध्ये सायकल वापराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून सुरू झालेली ही रॅली श्री शिवतीर्थ, श्री शंभुतीर्थ, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक, रसना कॉर्नर, चांदणी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे राणी बाग येथे पोहोचली. रॅलीचा समारोप स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
या कार्यक्रमास सहायक आयुक्त रामचंद्र कांबळे, सहायक आयुक्त नितीन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संगणक विभाग प्रमुख अजय जाधव, महापौरांचे स्वीय सहायक युवराज भोसले, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, उद्यान पर्यवेक्षक अनिकेत शिलेदार तसेच सहायक क्रीडा अधिकारी व रिंगण फिटनेस फाउंडेशनचे संस्थापक सचिन खोंद्रे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समता आणि लोककल्याणाच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून स्वच्छ, निरोगी आणि हरित इचलकरंजी घडविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

छ.शाहू महाराजांना अभिवादन करताना उपमहापौर अनिल डाळ्या,उपायुक नंदू परळकर,मनोज साळुंखे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा