आवाडे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त डीकेटीईकडून संशोधनाला नवी दिशा
इचलकरंजी
इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या ९६ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेत शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम यांचा संगम घडविणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डीकेटीईने विकसित करून डिझाईन पेटंट मिळविलेला समाजोपयोगी ‘बेड कम व्हीलचेअर’ हा प्रकल्प अॅड. प्रिती पटवा यांना आवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे, किशोरी आवाडे, उत्तम आवाडे, डॉ. सपना आवाडे आणि रवी आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. डायरेक्टर डॉ. एल. एस. आडमुठे यांनी स्वागत केले. माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे यांनी डीकेटीईच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान रुग्णसेवा अधिक सुलभ, सुरक्षित आणि परिणामकारक करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगितले.
डॉ. सपना आवाडे यांनी दादांना शुभेच्छा दिल्या, तर अॅड. प्रिती पटवा यांनी आपल्या गरजांनुसार विकसित करण्यात आलेल्या या उपकरणाबद्दल संस्थेचे आभार मानले. प्रा. सचिन कानिटकर, डॉ. मंजुनाथ रावळ, डॉ. अश्विनी रायबागी, डॉ. गिरीश मेकळके, प्रा. राहुल जोशी तसेच बी.टेक. मेकॅनिकलचा विद्यार्थी शुभम कोळी व सहकाऱ्यांनी या प्रकल्पाची यशस्वी निर्मिती केली.
यावेळी अॅड. प्रिती पटवा यांच्या जीवनावर आधारित ‘मनोबला’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला डीकेटीईचे विश्वस्त, विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, आवाडे व पटवा कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेटंट प्राप्त बेड कम व्हीलचेअरचे अनावरण करताना कल्लाप्पांणा आवाडे दादा,प्रकाश आवाडे,प्रीती पटवा व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








