ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीतील अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याविरोधात नोंदणी महानिरीक्षकांकडे तक्रार; जादा दराने विक्री व बनावट सहीचा आरोप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याविरोधात नोंदणी महानिरीक्षकांकडे तक्रार; जादा दराने विक्री व बनावट सहीचा आरोप

इचलकरंजी, ता. ३० :

इचलकरंजी येथील अधिकृत स्टॅम्प विक्रेते सौ. सुनिता प्रकाश मोरबाळे यांच्याविरोधात शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जादा रक्कम आकारून स्टॅम्प पेपरची विक्री केल्याचा तसेच अधिकृत विक्रेत्याऐवजी अन्य व्यक्तीकडून सही करून स्टॅम्प विक्री केल्याचा गंभीर आरोप करत विशेष कार्यकारी अधिकारी श्री. दिपक अशोक रावळ यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी गोल्ड लोनच्या कामासाठी १०० रुपयाचे दोन स्टॅम्प पेपर घेण्यासाठी संबंधित विक्रेत्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून शासन दरापेक्षा ५० रु. जादा रक्कम मागण्यात आली. चर्चेनंतर दोन स्टॅम्पसाठी एकूण २३० रु.आकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच स्टॅम्प पेपरवर अधिकृत विक्रेते सौ. मोरबाळे यांनी स्वतः सही न करता अन्य व्यक्तीकडून सही करून स्टॅम्पची विक्री करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध असल्याचे श्री. रावळ यांनी नमूद केले असून, संबंधित विक्रेत्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, बनावट सही करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदवावा, इचलकरंजीतील सर्व स्टॅम्प विक्रेत्यांची विशेष तपासणी व लेखापरीक्षण करावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या तक्रारीची प्रत मुद्रांक जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनाही पाठविण्यात आली असून, तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही श्री. रावळ यांनी दिला आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

बोगस बिगरशेती आदेशांच्या आधारे कोट्यवधींचे दस्त? इचलकरंजीतील व्यवहारांची फौजदारी चौकशीची मागणी” महसूल मंत्र्यांसह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार; गट क्रमांकांतील व्यवहार रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी