फाळणी भयावहता स्मृतिदिनानिमित्त इचलकरंजीत विशेष कार्यक्रम
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेअंतर्गत फाळणी भयावहता स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम शुक्रवारी (दि. १४) उत्साहात संपन्न झाला. महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे व परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
भारताच्या फाळणीच्या काळातील वेदनादायी घटनांचे स्मरण करून विस्थापन, हिंसाचार व यातना सहन केलेल्या नागरिकांच्या त्यागाला दोन मिनिटे स्तब्धता पाळून अभिवादन करण्यात आले. फाळणीच्या काळात लाखो नागरिकांना घरे, संपत्ती व जन्मभूमी सोडून स्थलांतर करावे लागले. अनेकांनी प्राण गमावले, तर असंख्य कुटुंबांना संकटांना सामोरे जावे लागले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम छाबडा यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून फाळणीची ऐतिहासिक पार्श्वभूमी व त्या काळातील परिस्थितीवर मार्गदर्शन केले. देशाची एकता, अखंडता, सामाजिक सलोखा व बंधुभाव जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी फाळणीशी संबंधित तैलचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना भगतरामजी छाबडा
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







