ICHMH51NEWS.IN
9921600800

यंत्रमाग कामगारांसाठी परवडणाऱ्या दरात १०९२ घरे; पुढे पाच हजार घरांचे उद्दिष्ट-माजी मंत्री प्रकाश आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

यंत्रमाग कामगारांसाठी परवडणाऱ्या दरात १०९२ घरे; पुढे पाच हजार घरांचे उद्दिष्ट-माजी मंत्री प्रकाश आवाडे

इचलकरंजी :

माजी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या संकल्पनेतून इचलकरंजीतील यंत्रमाग कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याची योजना सुरू असून, पहिल्या टप्प्यात १ हजार ९२ घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील काळात इचलकरंजीतील विविध भागांत जवळपास ५ हजार घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याची माहिती दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप. असोसिएशनचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी दिली.

असोसिएशनच्या ७८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पाटील यांनी संस्थेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा सादर केला. प्रकाश आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून, लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून २.५० लाख रुपये, तसेच महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाकडून १ लाख रुपयांपर्यंत अनुदान व इतर कर्ज सुविधांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इचलकरंजीला वस्त्रोद्योग निर्यातीचे केंद्र बनविण्यासाठी ‘टेक्स्टाईल एक्स्पोर्ट फॅसिलिटेशन सेंटर’ मंजूर होऊन कार्यान्वित झाले आहे. तसेच कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी यंत्रमाग उद्योगासाठी स्किल्ड वर्कर ट्रेनिंग मॉडेल व प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सूतामध्ये भेसळ रोखण्यासाठीही असोसिएशनने वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडे पाठपुरावा केला असून, गुणवत्तापूर्ण सूत उपलब्ध व्हावे यासाठी कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. वीजदर व अतिरिक्त वीजबिलांच्या प्रश्नांवरही असोसिएशनकडून वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठीही असोसिएशन प्रयत्नशील असून, सभासदांच्या अडचणी सोडविण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत राहील, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.यावेळी व्हाईस चेअरमन रफिक खानापुरे,संचालक मंडळ तसेच नगरसेवक अभिषेक वाळवेकर,ओंकार सुर्वे,सुशांत कलागते यांच्यासह सभासद,कारखानदार उपस्थित होते

वस्त्रोद्योगाच्या भल्यासाठी मला दिल्लीला पाठवा- प्रकाश आवाडे

वस्त्रोद्योगाच्या भल्यासाठी मला दिल्लीला पाठवा,जे माझ्या मनात आहे ते करून दाखवतो असे मनोगत त्यांनी भाषणात व्यक्त केले,त्यानंतर उपस्थित सभासदांनी हात उंचावत त्याना पाठिंबा दिला.यानिमित्ताने प्रकाश आवाडेंच्या खासदारकीची इच्छा परत एकदा व्यक्त झाली आहे.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा