ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, महानगरपालिका शाळा व अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधून प्रत्येकी एका शिक्षकाची निवड करण्यात आली आहे.

महानगरपालिका शाळांमधून विद्यानिकेतन, मनपा शाळा क्रमांक २७ येथील सौ. अलका आनंदा कदम यांची, तर अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधून मालती माने विद्यामंदिर येथील सौ. मनीषा संदीप कांबळे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारासाठी शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे विविध स्तरांवर काटेकोरपणे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये स्वयमूल्यमापन, मुख्याध्यापकांचे मूल्यमापन, केंद्रस्तरीय तसेच शहरस्तरीय मूल्यमापन अशा विविध टप्प्यांचा समावेश होता. या सर्व स्तरांवरील मूल्यमापन प्रक्रियेत गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या शिक्षकांची निवड करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न, विविध शैक्षणिक उपक्रम, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शाळेच्या विकासासाठी दिलेले योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य तसेच सामाजिक बांधिलकी या विविध बाबींचा विचार करून निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

पारदर्शक व वस्तुनिष्ठ पद्धतीने विविध निकषांवर करण्यात आलेल्या मूल्यमापनातून सौ. अलका कदम व सौ. मनीषा कांबळे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव झाला असून, शिक्षण विभाग, शिक्षकवर्ग आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा