ICHMH51NEWS.IN
9921600800

गणेशमूर्तीच्या मिरवणुकीत वाहतूक कोंडी; रस्ता मोकळा करण्यास सांगितल्याने पत्रकाराला धक्काबुक्की! “काय तक्रार करायची ती कर, आम्ही कुणाला घाबरत नाही” म्हणत शिवीगाळ; इचलकरंजी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गणेशमूर्तीच्या मिरवणुकीत वाहतूक कोंडी; रस्ता मोकळा करण्यास सांगितल्याने पत्रकाराला धक्काबुक्की!

“काय तक्रार करायची ती कर, आम्ही कुणाला घाबरत नाही” म्हणत शिवीगाळ; इचलकरंजी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा

इचलकरंजी : गणेशमूर्ती मिरवणुकीदरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीचा मार्ग मोकळा करण्याची विनंती केल्याच्या कारणावरून पत्रकाराला धक्काबुक्की, शिवीगाळ करून झटापट केल्याप्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ऋषीकेश एकनाथ राऊत (वय २८, रा. जांभळी, ता. शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शाहरुख मुल्लाणी, सुपीयान कलादुगे, शाहिद सनदी, अरबाज नगरजी, शकील लोकापुरे तसेच दोन अनोळखी इसम अशा एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास नारायण चित्र मंदिर ते मोठे तळे परिसरातील रस्त्यावर जनसेवा युवक मंडळ २१७ वजनात ग्रुप, इचलकरंजी यांची गणेशमूर्ती जात असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी फिर्यादी राऊत हे कार्यालयाकडे जात असताना वाहनांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याची विनंती मंडळाच्या कार्यकर्त्यांना करीत होते.

त्यावेळी आरोपींपैकी तिघांनी फिर्यादीस धक्काबुक्की केली, तर इतर आरोपींनी “तुला कुठे जायचे तिथे जा, काय तक्रार करायची ती कर, आम्ही कुणाला घाबरत नाही,” असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच दुखापत करण्याच्या उद्देशाने अंगावर धावून येत झटापट केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा