ध्वनी प्रदूषण टाळून नियमांचे पालन करून गणोशोत्सव उत्साहात साजरा करा-सुनील फुलारी.
इचलकरंजी
ध्वनी प्रदूषण करणाऱ्या कोणत्याही मंडळाची गय केली जाणार नसून नियमानुसार त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी नियमांचे पालन करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी इचलकरंजी येथे पत्रकार परिषदेत दरम्यान केले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवे उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना फुलारी म्हणाले गेल्या वर्षी ५२ मंडळावर कारवाई केली असून यावर्षी इचलकरंजीतील ३२ हुपरी कुरुंदवाड जयसिंगपूर येथील १६ अशा ४८ मंडळावर आगमन मिरवणुकीत कारवाई झाली आहे. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी नियमित आवाजमर्यादेचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले.डॉल्बीमालकांसोबत इचलकरंजी येथे पोलीस खात्याच्या ११ बैठका पार पडल्या,त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत त्यानंतरही मर्यादेचे उल्लंघन होत असेल तर कठोर गारदेशीर कारवाई करून खटले दाखल करण्यात येत आहेत.
फुलारी यांनी इचलकरंजी विभागाचा गणपती व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर तसेच गुन्ह्याचा आढावाही घेतला समाजात शांतता आहे अशीच शांतता प्रस्थापित राहू यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असून १६५७ सार्वजनिक मंडळाचे गणपती आहेत स्थापना शांततापूर्ण झालेली आहे.
समाजकंटकांच्यावर हद्दपारीची व प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत.सोशल मिडियाचे नियंत्रण सुरू असून स्थानिक स्तरावर इतर प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय ठेवलेला आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी नियोजन केलेले आहे,दंगल नियंत्रण पथक,गर्दी काबू पथक या सर्व यंत्रणा सज्ज आहेत २६५ गुंडांवर १२६ प्रमाणे कारवाई केली असून १८०० जणांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. १९ रेकॉर्ड वरील गुन्हेगारांच्या वर अप्पर पोलीस अधीक्षक कारवाई करत आहेत.पाच दिवस डॉल्बीला वेळेची मर्यादा वाढवून दिलेली आहे.
आपल्या क्षेत्रामध्ये एक गाव एक गणपती एकच ठिकाणी असून पूर्ण कोल्हापूर परिक्षेत्रात ९८९ ठिकाणी एक गाव एक गणपती संकल्पन राबवलेली आहे. त्या सर्वांना सन्मानित करण्यात यावे असे सूचना जिल्हास्तरावर दिलेल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.
इचलकरंजी शहरात गांजाच्या कारवाईबाबत अजून सुधारणा करण्यात येईल असेही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिले. त्याचबरोबर पोलीस नियमानुसार कारवाई करत असतात सायबर गुन्ह्याबाबत विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी मोबाईल चोरीचा असो वा सायबर फसवणुकीचा कोणताही गुन्हा स्थानिक पोलीस स्टेशनला घेऊन तो कोल्हापूरला पाठवण्यात येईल अशी ग्वाही दिली. जर कोणी पोलीस स्टेशन गुन्हा स्वीकारत नसेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे भेट घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800