महापालिका प्रशासन नेमके कोणत्या पक्षाचे ? शशांक बावचकर यांचा सवाल
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय कारकीर्द सुरु आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक व एकुणच महापालिका प्रशासनाने पक्ष निरपेक्ष काम करणे अपेक्षीत आहे. मात्र काही ठरावीक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या तालावर प्रशासन नाचत असल्याचा काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी जाहीर निषेध केला आहे. तसेच महानगरपालिका प्रशासनाचा कारभार महायुती शासनाचे घटक असल्यासारखा सुरु असुन प्रशासनाने यापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेने महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत काही विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याची कार्यक्रमपत्रिका आज प्रसिद्ध केली आहे. या पत्रिकेत प्रोटोकॉल पाळण्यासाठी विद्यमान मंत्री तसेच आमदार, खासदांरांचे नाव घालणे बरोबर आहे. मात्र त्यामध्ये महायुतीतील काही घटक पक्षांच्या माजी लोकप्रतिनीधींची नावेही घातली आहेत. प्रशासकीय कारकिर्दीत प्रशासन ठराविक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या तालावरत नाचत असल्याच्या या प्रकाराचा आणि आयुक्त, प्रशासनाच्या या पक्षपाती कारभाराचा जाहीर निषेध करतो. केवळ पत्रिकेत नावे घालण्यापुरता हा उद्योग मर्यादीत नसुन एखाद्या विभागातील विकास काम निविदेत धरायचे असेल तर पत्रिकेतील घातलेल्या नावापैकी एकाचे पत्र आणावे लागते, अशीही चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. याबाबत मी व मोरबाळे यांनी सहाय्यक आयुक्तांच्याकडे तक्रारीही केल्या आहेत. हा सर्व कारभार आयुक्त व प्रशासनाला अशोभनीय असुन प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचे सिद्ध होते. याचप्रमाणे एका युवा नेत्याने दहिहंडी कार्यक्रमाचे शहरात लावलेले डिजीटल फलक अतिक्रमण विभागाने तातडीने व नियमाप्रमाणे काढले परंतु फलक काढणार्या कर्मचार्याला प्रशासनाने धारेवर धरल्याचे समजते. एकुणच महानगरपालिका प्रशासनाचा कारभार महायुती शासनाचे घटक असल्यासारखा सुरु असुन प्रशासनाने यापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणीही शशांक बावचकर यांनी केली आहे.
प्रशासन सत्ताधाऱ्यांचे बाहुले.
महापालिका प्रशासनातील आयुक्तांना सत्ताधारी पक्षातील एका गटाने आणल्याबाबत सर्वत्र सुरवातीपासून चर्चा सुरू आहे.या चर्चेत “अर्थ” असल्याचे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर असलेल्या नावावरून स्पष्ट होत आहे.प्रशासन हे सत्ताधाऱ्यांचे बाहुले असल्यासारखे वागत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800