सेवासदन कार्डिओलॉजी व आयसीयू टीमने केली अत्यंत क्लिष्ट ओपन हार्ट सर्जरी-उल्लेखनीय कामगिरी बाबत कौतुक.
इचलकरंजी
१ मे २०२१ रोजी डॉक्टर रविकांत पाटील सेवासदन लाईफ लाईन हॉस्पिटल मिरज यांनी इचलकरंजी येथील निरामय हॉस्पिटल यांच्या समन्वयाने सेवासदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड हे हॉस्पिटल आपल्या इचलकरंजी शहरांमध्ये सुरु केले आहे. हे हॉस्पिटल सुरु करण्यामागे डॉक्टर रविकांत पाटील यांचा एकच हेतू होता तो म्हणजे आपल्या इचलकरंजी शहरांमध्ये सर्व सुपर स्पेशलिटी सेवा समाजातील सर्व तळागाळातील लोकांना इथेच उपलब्ध व्हाव्यात.
त्याच अनुषंगाने सरांनी येथे कॅथलॅब, ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, यूरोलॉजी अशा विविध सुपर स्पेशलिटी साठी लागणाऱ्या सुसज्ज यंत्रणा येथे चालू केलेले आहेत.
अगदी गेल्याच दहा दिवसांपूर्वी अतिशय गुंतागुंतीची ओपन हार्ट शस्त्रक्रिया दिनांक सहा सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडलेली आहे. पेशंटची प्रकृती देखील उतम आहे.इचलकरंजीत कोणत्याही प्रकारचे हृदयरोग विभागाशी निगडित अवघड शस्त्रक्रिया पार पडू शकतात अशी माहिती रितीची माहित सेवासदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्डिओलॉजी टीम ने दिली.
डॉ. रविकांत पाटील -सेवासदन ग्रुपचे चेअरमन असून पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित कार्डिओलॉजिस्ट वीस वर्षापेक्षा जास्त अनुभव आणि ५० हजार पेक्षा जास्त प्रोसिजर केलेले डॉक्टर आहेत. पश्चिम महाराष्ट्र मध्ये सेवासदच्या काही शाखा तर चालवल्याच आहेत ज्यापैकी एक इचलकरंजी बेळगाव येथे आहे. तसेच हॉस्पिटलची प्रमुख ब्रँच मिरज सेवासदन साडेतीनशे बेडचे हॉस्पिटल आपल्या सेवेमध्ये रुजू आहे. तसेच दुबई, बहरीन, व्हिएतनाम सारख्या बाहेरच्या देशात देखील त्यांच्या शाखा आहेत.तसेच डॉ. राहुल वाल्हेकर ज्यांना १४ ते १५ वर्षाचा एक्सपिरीयन्स असून चार वर्ष कार्डिओलॉजी मध्ये एक्सपीरियंस आहे हजार पेक्षा जास्त केसेस त्यांनी ऑपरेट केलेले आहेत. रोटाअबिलेशन आणि ओ सिटी यासारख्या प्रोसिजर देखील अत्यंत कुशलतेने पार पाडण्याची कला असलेले असे हे डॉक्टर सेवा सदन सोबत आपल्या कार्डिओलॉजी विभागांमध्येच काम करत आहेत.डॉ. अमोल भोरे हे एमडी मेडिसिन पूर्ण झाले असून डीएनबी कार्डिओलॉजी त्यांनी पुना हॉस्पिटल मधून केलेली आहे सह्याद्री आणि रुबी सारख्या हॉस्पिटल्स मधून त्यांना साडेचार वर्षाचा एक्सपीरियंस आहे या डॉक्टरांनी सुद्ध हजार पेक्षा जास्त केसेस ऑपरेट केलेले आहेत. डॉक्टर अमोल भोरे देखील रोटाबिलेशन आणि ओ सिटी सारख्या प्रोसिजर अत्यंत उत्तम रित्या पार पाडल्या आहेत. हार्ट फेल्युअर आणि हार्ट डिसीजेस मध्ये हातखंडा असणारे हे दोन्ही सर्जन आमच्याकडे कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
कार्डिओलॉजी सर्जरी (ओपन हार्ट सर्जरी) विभागांतर्गत डॉ अमृतराज नेरलीकर सर आपल्या सोबत कार्यरत आहेत. सरांनी आपली एम सी एच कार्डियाक सर्जरी ही डिग्री एसआरसीएम चेन्नई येथून घेतलेली आहे. तेरा वर्षाच्या अनुभव असणाऱ्या सरांनी ६००० पेक्षा जास्त लहान मुलांच्या तसेच प्रौढ लोकांमधील अत्यंत किचकट अशा ओपन हार्ट सर्जरी केलेला आहेत. सिरीज ऑफ आर्टिकल स्विच ऑपरेशन, पलमनरी इनडायरेक्टॉमी, आरोटिक रूट सर्जरी आणि टोटल आर्टिरियल रिव्हेस्क्युलायझेशन अशा सर्व प्रकारचे ऑपरेशन डॉक्टर अमृतराज सर यांनी पार पाडले आहेत.तसेच डॉ. पृथ्वीराज पाटील हे देखील एम एस सर्जन, एमसीएच इन कर्डियट सर्जरी असून गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ५०० पेक्षा जास्त ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह केअर साठी सुसज्ज आयसीयू आणि सीसीयू, सी व्ही टी एस रिकव्हरी विभाग कार्यरत आहेत.या विभागांतर्गत २४ तास सेवा देण्याचे काम डॉक्टर शिवकुमार कट्टी सर एमडी मेडिसिन हे करीत आहेत. सहा वर्षापेक्षा जास्त क्रिटिकल केअर मॅनेजमेंट चा अनुभव तसेच डायबेटोलॉजी मध्ये निष्णात असणारे हे डॉक्टर आपल्या टीमचा एक भाग आहे. त्यांच्यासोबत डॉक्टर रोहन कांबळे सर हे मेडिकल एडमिन म्हणून काम करीत असून इंटेन्सिव्ह केअर ची सर्व जबाबदारी कट्टी सर आणि टीम सोबत डॉक्टर रोहन कांबळे पार पाडत आहेत.
या सर्व टीम सोबत काम करणारे परफ्यूजनेस पॉल ब्रदर, सोल ब्रदर हर्षल, तसेच आमच्या ओटी मधील लखन ब्रदर आप्पा काका तांबेकर, तसेच आयसी विभागातील इन्चार्ज माधुरी सिस्टर आणि त्यांच्या अंतर्गत कारण काम करणारे टीम अशी सुसज्जय यंत्रणा आपल्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे.
आम्हाला सेवासदन हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून कळविण्यात आनंद होतो की आता इचलकरंजीकरांना कोणत्याही प्रकारच्या कारडी एक्स सर्जरींसाठी मिरज किंवा कोल्हापूर येथे धावपळ करण्याची गरज नसते आपल्या इचलकरंजी मध्येच सेवासदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड येथे अशा सर्व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या जातात.यावेळी उपस्थित डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.यावेळी के व्ही आनंद,गायत्री डुबल,स्वप्निल सर आदि उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800