डॉ राहूल आवाडे यांच्या वाढदिनानिमित्त गावभाग येथील जगताप तालीम येथे आरोग्य शिबीर संपन्न
इचलकरंजी ता. २२ सप्टेंबरः इचलकरंजीमधील गावभाग येथील जगताप तालिम मंडळ येथे आण्णा कावतील ग्रुप, न्यू. संगम तरुण मंडळ, स्फुर्ती कॉर्नर, मानाचा राजा, बाप्पा मोरया ग्रुप आणि मिरज येथील अरीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ राहुल आवाडे यांच्या वाढदिनी अभिनव उपक्रम घेवून सुमारे ४०० हून अधिक महिला व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबीरामध्ये मोफत औषधउपचारासह, टी.टी. चे इंजेक्शन मोफत देण्यात आले.
शिबीराचे उदघाटन डॉ राहुल आवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अशा शिबीराचे आयोजनामुळे सर्व सामान्य नागरिकांच्यावर मोफत उपचार होत आहेत. आरोग्य शिबीर हे सध्याच्या परिस्थीतीमध्ये महत्वाचे शिबीर असून अशा शिबीरामुळे अनेक गरीब कुटुंबीयांना मदत होत असून मोठया अजारांच्यावर निदान होत आहेत. असे शिबीर यापुढेही घेण्यात यावीत यासाठी शासनाकडून लागेल ती मदत उपलब्ध करुन दिली जाईल असे प्रतिपादन डॉ राहूल आवाडे यांनी या शिबीरादरम्यान काढले.
गावभागातील जगताप तालीम मंडळ, आण्णा कावतील मंडळ, न्यू संगम मंडळ यांनी यापूर्वीही वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेतले आहेत तसेच अनेक उत्सव हे आरोग्य उत्सव म्हणून देखील साजरे केलेल आहेत. कार्यक्रमाचे स्वागत किरण लंगोटे यांनी केले. मनोगत, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागाते यांनी केले. आभार ताराराणी अध्यक्षा उर्मिला गायकवाड यांनी केले
सदर कार्यक्रमास माजी नगरसवेक नंदू पाटील, संजय जगताप, अनिकेत पाटील, किशोर पाटील, प्रशांत कांबळे, मोहन चौगुले, किशोर निंबाळकर, संग्राम लोंढे, एस.एस.जकाते, अविनाश परिट, सुनिता पाटील, सीमा कमते, सविता जगताप, अनुराधा जगताप, सुनिता कोठीवाले, अमृता जगताप, विजया गुंडप, सपना जगताप, अरुणा चौगुले, त्रिवेणी जगताप, अनिता दत्तवाडे, सुनिता गावडे, रेखा जगताप, समिक्षा हेरलगे, डॉ प्रकाश पाटील, उबेद महात, अविनाश दत्तवाडे, नागेश जाधव यांच्यासवे अरीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबीराच्या आयोजनाबद्दल भागातील नागरिकांनी समाधन व्यक्त केले.
फोटो- जगताप तालीम मंडळ येथे शिबीराप्रसंगी मार्गदर्शन करीत असताना डॉ राहुल आवाडे समोर उपस्थित भागातील महिला व नागरिक.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800