घरेलू महिला कामगारांच्या विविध मागण्याचे निवेदन.
इचलकरंजी
इचलकरंजीतील घरेलू महिला कामगारांना बोनस व इतर मागण्या बाबत निवेदन सहायक कामगार आयुक्त कार्यलायात देण्यात आले.
घरेलू मोलकरीण कामगारांना त्यांना त्यांच्या कुटुंबातील आर्थिक आधार नसणे तसेच मुलांचे शिक्षण यासारख्या विविध कारणास्तव दुसऱ्यान्चे घरी धुणी-भांडी साफ सफाई,स्वयपाक व इतर कामे करावी लागत आहेत.कामाचा तुटपुंजा मोबदला आणि कामाची शाश्वती नसल्याने अनेकजण वय झाले तरीही हे काम करीत आहेत वेळ पडलेस,आजारी असल्यास घरातील मुलीना इतर सदस्यांना त्यांचे कामावर पाठवावे लागते.जशी महागाई वाढली तसे अनेकांचे पगार वाढले जातात.मात्र घर काम करणाऱ्या महिलांचे पगार वाढत नाहीत.अनेक वेळा कामावर एक दिवस येणार नाही तसेच थोडा जरी वेळ झाला,काम नीट केले नाही तरी एक दिवसाचा पगार कपात केला जातो.घरी कोणी आजारी असलेतरी कामावर जावे लागते.
वरील एकूण घरेलू महिला कामगारांची सत्य परिस्थिती पाहता घरेलू मोलकरीण कल्याणकारी मंडळकडून खालील मागण्या करण्यात आल्या.महिला कामगारांना किमान दहा हजार दिवाळी बोनस कल्याणकारी मंडळाकडून मिळावेत.घरेलू महिला कामगारांना मंजूर भांडी सट तातडीने देणेची कार्यवाही करावी.बहुतांश महिला यांचे शिक्षण कमी तसेच त्यांचे अजाणतेपणी लक्षात न राहिलेने यापूर्वी म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत नोंदणी असलेल्या सर्व घरेलू कामगार यांचे नुतनीकरण करून घेणेस सहकार्य करावे तसेच सद्या मिळत असलेल्या भांडी सट यानाही त्यांचे नुतनीकरण करून झालेनंतर मिळावे.कामगार कल्याणकारी मंडळ बळकट करून सर्व नोंदीत महिला कामगारांना पेन्शन,आरोग्य विमा,तसेच त्यांचे मुलांचे करिता शैक्षणिक शिष्यवृत्ती करिता भरीव तरतूद करणेत यावी.
आमच्या वरील सर्व मागण्याचे त्वरित विचार करून अंमलबजावणीसाठी योग्य ते आदेश व्हावेत अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी नीता भिसे,कविता सांगले,शीतल वागवकर,कॉ.सुनिल बारवाडे उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800