राष्ट्रीय सेवा योजनेमधील श्रमदानातून व्यक्तिमत्त्वाचा खरा विकास होतो….श्री अनिल कुंभार.श्रीमती आ.रा. पाटील कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, कष्ट, प्रामाणिकपणा,समाजप्रती आदर या गोष्टींचा विकास होतो आणि त्याला श्रमदानाची जोड मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन श्री अनिल कुंभार यांनी केले.
येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट करताना, यामध्ये स्वयंसेवकांनी आपले सक्रिय योगदान दिले तर ती एक प्रकारची देशसेवाच असेल, असे मत व्यक्त केले.
आणि सर्व स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख कार्यक्रमाधिकारी डॉ. धीरज शिंदे यांनी केले.प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ.प्रियांका कुंभार यांनी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी केले तर आभार प्रा.स्वाती हाळवणकर यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800