इचलकरंजी ब्राह्मण सभे तर्फे महाराष्ट्र शासनाने परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर केल्याबद्दल फटाक्यांच्या आतिषबाजी सह साखर,पेढे,वाटून आनंदोत्सव साजरा.
इचलकरंजी
ब्राह्मण सभा कार्यालयात समाजातील ज्ञाती- बंन्धु भगिनींनी ब्राह्मण समाजाची अनेक वर्षापासून प्रलंबितअसलेली परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट बैठकीत मंजूर केले बद्दल महायुती शासनाचे व मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत साखर,पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करणेत आली सर्व ज्ञाती-बंन्धु भगिनी,प्रशासन,प्रत्यक्ष-अप्रत् यक्षपणे लढा दिलेल्यांचे तसेच सातत्याने पाठपूरावा करुन उपोषणाव्दारे ब्रह्मबंधू श्री दीपक रणनवरे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल खास आभार व अभिनंदन करणेत आले.यावेळी इचलकरंजी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुरेश ऊर्फ बंडा जोशी उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णीं सेक्रेटरी संजय मैंदर्गी विस्वस्त शैलेश गोरे, दिगंबर कुलकर्णीं, जयंत फडके,ॲड.मोरेश्वर सहस्रबुध्दे, मंदार जोशी,मनीष आपटे,अनिल उत्तुरकर,उमेश कुलकर्णीं,शेखर कुलकर्णीं,शामराव कुलकर्णीं,विश्राम कुलकर्णीं, प्रमोद मिराशी, कल्पेश दंडगे,सचीन सवदी, पद्माकर हणमसागर,हर्षल देशपांडे श्रीधर शिरुर,विजय कुलकर्णीं,अरविंद कुलकर्णीं,चेतन उत्तुरकर, विजय आपटे,मनोहर जोशी, हितेंद्र वझे, राजेंद्र मराठे,सागर मराठे, मोहन जोशी,संजय कुलकर्णीं,अनुप हल्याळकर,प्रा.मिलिंद दांडेकर तसेच समाजातील सर्व ज्ञाती-बंन्धुभगिनी उपस्थीतीत होते.या लढ्यासाठी वेळोवेळी ब्राह्मण सभेने आवाहन केले प्रमाणे समाजातील सर्व ज्ञाती बंधु-भगिनीं मा.प्रांताधिकारी, मा.खासदार,मा.आमदार यांना निवेदन देण्यासाठी एकत्रआल्यामुळे या लढ्यास यश आल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800