कन्या महाविद्यालयात गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे गांधी जयंती निमित्त स्वच्छता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ही शुभेच्छा देण्यात आल्या.यामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी उपस्थित राहून महाविद्यालय आणि परिसराची स्वच्छता केली.
केंद्र सरकार राबवत असलेल्या स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने विद्यार्थिनींमध्ये परिसर स्वच्छते बद्दल प्रबोधन करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन प्रमिला सुर्वे, डॉ.धीरज शिंदे यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी, गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800