आमदार आवाडे यांच्या प्रयत्नातून स्वराज्य संस्थांच्या
परिक्षेत्रात नागरी सोयी-सुविधा अंतर्गत 5 कोटीचा निधी
इचलकरंजी
गत वर्षभरात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार्या आमदार प्रकाश आवाडे यांनी आचारसंहिता लागण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पाठपुरावा केला. त्यातूनच स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचेही सहकार्य लाभले.
आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने मतदारसंघातील इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. मागील वर्षभरात त्यांनी विकासकामांचा धडाकाच लावला असून कोट्यवधीचा निधी खेचून आणला आहे. त्याच अनुषंगाने स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सोयी-सुविधा पुरविणेसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.
यामध्ये इचलकरंजीतील विविध प्रभागामध्ये रस्ते, शौचालय, पेव्हिंग ब्लॉक, संरक्षक भिंत, गटर्स, नाना-नानी पार्क, चिल्ड्रन पार्क आदी कामे केली जाणार आहेत. लिंबू चौकातील खुल्या जागेत नाना-नानी पार्क व चिल्ड्रन पार्क उभारण्यात येणार आहे. तर व्यायामशाळा, उद्यानात खेळणी बसविणे यांचाही समावेश आहे. या निधीमुळे प्रलंबित कामे मार्गी लागणार असून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800