आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून स्वच्छतेच्या कामाची पाहणी, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश
इचलकरंजी
दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात स्वच्छतेचे काम काटेकोरपणे करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आरोग्य विभागास दिलेल्या आहेत.
यावेळी सदर वॉर्ड मधील हजेरी पत्रका वरील हजेरी प्रमाणे सर्व सफाई कर्मचारी भागात काम करत असले बाबतची पडताळणी करणे साठी स्वतः आयुक्त यांनी सहा.आयुक्त यांचेसह मुकादम यांचे समवेत संपूर्ण परिसरात फिरती केली असता वॉर्ड क्रं.१५ मधील एकूण २२ पैकी ४ कर्मचारी त्यांना दिलेल्या हद्दीवर काम करताना किंवा सदर परिसरात आढळून आले नाहीत. सदर अत्यंत गंभीर बाब निदर्शनास आलेने आयुक्त यांनी तातडीने गैरहजर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची आजची गैरहजेरी लावून त्यांची एक वार्षिक वेतनवाढ कायम स्वरूपी का थांबविण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश संबंधित विभागास दिले.
तसेच वॉर्ड क्रं.१५ मधील एक कर्मचारी स्वच्छतेचे काम करण्याऐवजी एका ठिकाणी बसून मोबाईल पाहत असल्याचे निदर्शनास आलेने त्याही कर्मचाऱ्यास शिस्तभंगाची कारवाई का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
यापुढेही शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत आरोग्य विभागाकडील ज्या वार्डमधील सफाई कर्मचारी सफाईच्या कामामध्ये हलगर्जीपणा करतील त्यांचेवर आणि त्या वॉर्ड मधील मुकादम, स्वच्छता निरीक्षक आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक यांचेवर कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी दिला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800