आयुक्तांची स्टंटबाजी,पोलिसांचा ठेंगा,अतिक्रमण निर्मूलन पथक ताटकळले.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आयुक्तांची स्टंटबाजी,पोलिसांचा ठेंगा,अतिक्रमण निर्मूलन पथक ताटकळले.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात शिस्तबद्ध बाजार भरवण्यात यावा यासाठी महापालिका प्रशासनाने रोडच्या दुतर्फा विक्रेत्याना बसण्यास सवलत देऊन मध्ये अत्यावश्यक वाहतुकीसाठी रस्ता बॅरिकेटर्सने पॅक केला,सोमवारी काही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडल्याने अखेर पालिका प्रशासनाचे अतिक्रमण निर्मूलन पथक हतबल होऊन परतले व राज्य महामार्ग बंद झाला.अतिक्रमण निर्मूलन पथकाने अवघ्या ७ कर्मचाऱ्यांवर खिंड लढवत मार्ग खुला ठेवण्याचे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.मात्र नंतर अचानक झालेल्या रस्ता रोकोने त्याना हतबल होऊन परतावे लागले, त्यानंतर आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत असल्याचे भासवत  पोलीसाना पत्र देण्याचे फर्मान काढले खरे मात्र पत्र देता देता दुपार झाली,तिन्ही पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेला पत्रव्यवहार करूनही सायंकाळी ७ वाजेपर्यत अतिक्रमण निर्मूलन पथक हात चोळत वाट बघत बसले व हतबल होऊन परतले.अधिकारी मात्र केबिनमधे बसून मजा घेत होते.
आयुक्तांनी मी काम करत असल्याची स्टंटबाजी केली,पोलिसांनी ठेंगा दाखवला तर अतिक्रमण निर्मुलन पथक मोकळ्या हाताने परतले असल्याने मोहिमेचा फज्जा तर उडाला व राज्य महामार्ग दुसऱ्या दिवशीही बंद राहिला.
इनामची नियोजनबद्ध बाजार भरवण्याचीच मागणी.
इचलकरंजी शहरातील किरकोळ व्यापारी यांचे नुकसान न होता त्याना एका ठिकाणी स्थलांतरित करून सुविधा उपलब्ध करून देत बाजार भरवण्याची मागणी इनामने केली होती मात्र काही जण खोडसाळ पद्धतीने छोट्या व्यापाऱ्यांना विरोध असल्याचे गैरसमज पसरवत असल्याने इनामने याबद्दल नाराजी व्यक्त केली असून खोडसाळ प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला आहे.गेल्या काही वर्षात झालेल्या दुर्घटनाचा विचार करता इनामची मागणी ही प्रशासनाकडे असून ती रास्तच असल्याचे तसेच फटाके विक्रते यांनीही शिस्तबद्ध ठरवून दिलेल्या ठिकाणी विक्री केल्याने इनामने फटाके विक्रेते यांचे आभार मानले आहेत.
महापालिकेची संशयास्पद भुमिका.
महानगरपालिकेने आरोग्य विभागाचे कर्मचारी पुरवले नाहीत तर महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी अतिक्रमण हटवण्यासाठी काम करतील असे त्यांची नेमणूक करताना सांगण्यात आले होते. त्यांचाही उपयोग झाला नाही पोलिसांनीही बाजू झटकल्याने महापालिकेने केलेला प्रसिद्धी व बॅरिकेटिंगचा खर्च वाया घालवला व मक्तेदाराच हित साधले गेले अशी चर्चा करदाते नागरिक करत आहेत.
फोटो- महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांच्या करातून गोळा केलेल्या पैशातून बॅरिकेटिंग केले त्याचा वापर विक्रेत्यानी असा केला.
छायाचित्र-उमाकांत दाभोळे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More