कोल्हापूर जिल्हा कुमारांची संघनिवड संपन्न,८ संघातून १५ खेळाडूंची निवड


कोल्हापूर :: खेळातील जागानिहाय निवडक खेळाडूंचे संघ तयार करून त्यांच्यातील स्पर्धेतून कुमारांचे कोल्हापूर जिल्ह्याचे संघ निवडण्याचा वेगळा उपक्रम कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे वतीने राबविण्यात आला.येथील एल. आय. सी. क्रिडांगणावर घेण्यात आलेल्या या निवड चाचणीत विविध क्रीडासंस्थेचे ११२ मुले व ६४ मुली सहभागी झाल्या होत्या.यातून कुमारांचे कोल्हापूर जिल्ह्याचे प्राथमिक संघ निवडण्यात आले.
कुमारांच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा संघाच्या निवडीसाठी हा वेगळा उपक्रम राबविण्यात आल्याचे जिल्हा संघटनेचे महासचिव प्रा.संभाजी पाटील यांनी सांगितले.
जिल्हा संघटनेला सलग्न क्रीडासंस्थाकडून निवडक नोंदणीकृत खेळाडू बोलावून त्यांचे खेळातील जागानिहाय मुलांचे चौदा व मुलींचे आठ संघ तयार करण्यात आले. त्याना जिल्ह्यातील नामवंत दिवंगत खेळाडू.संघटकांचे नाव त्यांच्या नावाच्या स्म्रुती संघात रंगलेल्या स्पर्धेतून पंधरा खेळाडू निवडण्यात आले.मल्हारपंत बावचकर, हिंदुराव कौंदाडे, बाबुराव परितेकर,विलास पाटील,नेमगोंडा पाटील,वीरसेन पाटील, रविंद्र गावडे, पद्माकर गोसावी, सदाशिव जौंदाळ, गोविंद घाटगे, आनंदराव वड्ड , के.डी.पाटील, राजेंद्र जगदाळे, तात्या पवार,यांची नावे देण्यात आली होती.प्रत्येक संघाला गणवेश व प्रशिक्षक देण्यात आले.
नामदेव गावडे,शंकर पोवार व शरद पवार यांच्या समितीने मुलांचे तर चंद्रशेखर शहा, प्रकाश कळंत्रे व अनिल कुटरे यांच्या समितीने मुलींचे संघ निवडले.या निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनातून घेण्यात येणार असून या खेळाडूंनी आपल्या सांघिक कौशल्यातून कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.रमेश भेंडिगिरी यांनी केले.
येथील सह्याद्री क्रीडा मंडळाच्या क्रिडांगणावर आयोजित या कुमारांच्या निवड चाचणीवेळी जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष भगवान पवार, अजित पाटील, कोषाध्यक्ष प्रा.आण्णासाहेब गावडे, सहकार्यवाह उदय चव्हाण,प्रा.चंद्रशेखर शहा, शहाजहान शेख, रुपेश जाधव यांच्यासह विविध क्रिडा संस्थेचे व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800