विविध उपक्रमांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे जागतिक एड्स दिन साजरा.
इचलकरंजी:
एड्स आजाराबद्दल सामाज्यामध्ये जागरूकता वाढवण्याच्या व प्रतिबंधाबद्दल समाजातील लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन एका विशिष्ट थीमवर लक्ष केंद्रित करतो “मार्ग हक्काचा,सन्मानाचा ! असा उल्लेख केलेल्या थीम लक्षात घेऊन इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वनल करून करण्यात आली. या जागतिक एड्स दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
एचआयव्ही बाधित लहान बालकांना मार्गर्शन करण्यात तसेच त्यांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात. रुग्णालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच त्याचे मान्यवरांच्या उपस्थित परीक्षण करून त्याचे नंबर काढण्यात आले आणि विजेत्यांना बक्षिस वितरण करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. नर्सिंग इन्स्टिट्यूट ऑफ शरद कॉलेज यड्राव येथील विधार्थिनी एक एड्स जनजागृती पर एक पथनाट्य सादर केले.
तसेच समाजातील लोकांना या आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी रॅली चे आयोजन करण्यात आले होते.सदर रॅली मध्ये इचलकरंजी शहरातील विविध शाळांनी सहभाग घेतला या रॅलीची सुरवात आयजीएम रुग्णालयापासून ते शिवतीर्थ ते बीसएनएल ऑफिस ते आयजीएम रुग्णालय अशी होती सदर कार्यक्रम हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ भाग्यरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी क्षयरोग चिकित्सक डॉ मानसी कदम एआरटी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सूर्यकांत खारगे रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आयसीटीसी विभागातील कर्मचारी रुग्णालयातील परीसेवीका रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800