क्रेन कारवाई वर तक्रारी झाल्याने रहिवाश्यांच्या गाड्या टार्गेट,वाहतूक पोलिसांचा प्रताप.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील वाहतुक पोलिसांच्या कामगिरीबाबत सतत तक्रारी होत असतात,तक्रार आली की समजूत काढून मिटवणे व त्यानंतर परत वसुलीचा एककलमी कार्यक्रम सुरू ठेवणे हा उद्योग वाहतूक पोलीस करत आले आहेत.
गेल्या २-३ दिवसपासून सोशल मिडियावर क्रेनच्या कारवाईबाबत नाहरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने २ दिवसात क्रेनची कारवाई आकसली आहे मात्र काही पोलीस कर्मचारी गल्ली बोळात फिरून गाड्यांचे फोटो काढत आहेत व त्यावरून ऑफिसमधे बसून दंड मारण्याचा सपाटा सुरू केला आहे.
हवामहाल बंगल्याजवळ ३५ वर्षापासून एका व्यावसायिकाचे घर व दुकान आहे,आपल्या दुकानाच्या समोर वर्षानुवर्षे फुटपाथच्या आतमध्ये सदर व्यावसायिक नियमित गाडी पार्क करत असतात.दुचाकीवरून २ पोलीस त्यांच्या दुकानसमोरून फोटो काढून गेल्याचे त्यांना जाणवले तर संध्याकाळी त्यांना नो पार्किंगचे ऑनलाईन चलन झाले असल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त झाला.
सदर ठिकाणी एक बँक,एक वृत्तपत्र कार्यालय असून कोणताही नो पार्किंगचा साधा फलकही नाही अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या नागरिकांच्या गाड्यावर कारवाई करून वाहतूक पोलीस कारवाईचे टार्गेट पुर्ण करत आहेत का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असून चुकीच्या पद्धतीने दंड केलेल्या वाहतूक पोलिसांविरोधात सदर वाहनधारक वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे समजते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800