इचलकरंजीत 2 ते 6 जानेवारी 2025 रोजी रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन.
रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने 2 ते 6 जानेवारी 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत भव्यपणे साकारत आहे. या वर्षीचे रोटरी ट्रेडफेअरचे 24 वे वर्ष आहे.
ट्रेड फेअरचे उद्घाटन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते होणार आहे,तर समारोप आ.राहुल आवाडे व डिस्ट्रिक्ट गवर्नर शरद पै यांच्या उपस्थितीत होणार आहे. इचलकरंजीच्या एकमेव पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारणार आहे. इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणेची ही इचलकरंजीतील एकमेव व उत्तम पर्वणी आहे.
या वर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तू, इलेकट्रीकल वस्तू, गृहोपयोगी उत्पादने, गारमेंट मशिनरी, वॉटर प्युरिफायर, लेडीज व जेंट्स डेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, एज्यूकेशन, सोलर, अॅक्युप्रेशर बॉडी मसाजर, व्यायामाची साधने, आयुर्वेदीक उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, विविध प्रकारचे मसाले इ. चे स्वतंत्र विभाग मांडणेत येणार आहेत. विविध कंपन्या व फर्म यांचे स्टॉल्स यामध्ये ग्रीनसन सोलर सोल्यूशन, शिवम इंटरप्राईज, उपाध्ये अॅन्ड सन्स, गोविंद मिल्क (फलटण), सेंट्रल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, क्लिनर्स अॅन्ड शायनर्स, अमोघसिध्दी आयुर्वेदीक, लाईफ सोलर, परंपरा बॅन्ड स्पायसेस, काश्मिरी शॉल, तनिष्का इंटरप्राईजेस, स्वनिधी अॅग्रो फूड इत्यादी अनेक नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.
खवय्यांसाठी शुध्द शाकाहारी अत्यंत लज्जतदार व हायजेनिक पद्धतीने बनविलेले विविध खादयपदार्थाचे स्टॉल असणार आहेत. आईस्किम, फूट स्टॉल तसेच मनोरंजनाचे विविध कार्यकम, मुलांच्याकरिता मिनि वर्ल्ड असणार आहेत. ट्रेड फेअर पाहण्यास येणा-या नागरिकांकरीता प्रवेश कुपनवर दररोज लकी ड्रॉ काढण्यात येऊन आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
यावेळी महिलांच्या करीता विविध स्पर्धांचे आयोजन ही करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवार दि. 03/01/2025 रोजी दुपारी 2 ते 3 या वेळेत संस्कारभारती रांगोळी स्पर्धा होतील. तसेच दुपारी 3 ते 4 या वेळेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे स्पर्धा होतील. शनिवार दि. 04/01/2025 (रोजी दु. 2 ते 3 या वेळेत मेहंदी स्पर्धा होतील. दु. 3 ते 4 या वेळेत पाककला स्पर्धा होतील. रविवार दि. 05/01/2025 रोजी दु. 4 ते 5 या वेळेत श्री. महालक्ष्मी पूजन सजावट स्पर्धा होतील. प्रत्येक स्पर्धेकरीता प्रवेश फि रु. 60/- असन विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी आपली नावे मो. नं. 9822523444, 9923098888,9822535308, 9922240990, 9422045518 या वर संपर्क साधून अधिक माहीती घ्यावी.यातून मिळणारी रक्कम ही वर्षभर विविध समाजउपयोगी कार्यक्रमासाठी वापरली जाते. गरजू लोकांना मदत, प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना कॉम्प्युटर, बॅचेस, स्वच्छतागृह, पोलिओ निर्मूलन, वृक्षारोपण, विद्यार्थी दत्तक योजना, व्होकेशनल अवार्ड, शालेय विद्यार्थी व युवकांकरीता विविध कला-किडा स्पर्धांचे आयोजन, महिलांना स्वावलंबनासाठी मदत, शालेय मुलांना सायकलीचे वितरण, दिव्यांगासाठीचे कार्यक्रम, विविध वक्त्यांची व्याख्याने, ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलने, मोतिबिंदु शस्त्रक्रिया व विविध वैदयकीय तपासणीद्वारा गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिरे व इतर उपकम घेतले जातात.
या प्रदर्शनामध्ये स्टॉलची सुबक मांडणी केली असून, नागरिकांना प्रदर्शन पाहणेकरिता रुंद व प्रशस्त जागा, आधुनिक भव्य मंडप, संपूर्ण परिसर मॅटीनने आच्छादित तसेच चोविस तास विशेष सुरक्षा व सीसीटीव्ही (cctv) दररोज स्टेज शो, कराओके गाणी, मिमिकी चे उत्कृष्ठ कार्यक्रम, आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉ इ. चे आयोजन ही यावर्षीची खास वैशिष्टे आहेत.
इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणेची ही इचलकरंजीतील एकमेव व उत्तम पर्वणी आहे. स्टॉल बुकींगकरिता रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन रो. मनिष मुनोत (9822023444), रो. संजय खोत (9422412346), रो. महादेव खारगे (9822665858), रोटरी ट्रेडफेअर सेक्रेटरी रो. पंकज कोठारी (9823095907) रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील (9422049218) सेक्रेटरी रो. चंद्रकांत मगदूम (9130935688), बॅनर जाहीरात साठी रो. सत्यनारायण धूत (9822878824) यांच्याशी संपर्क साधावा.
या पत्रकार परिषदेस रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम, रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन मनिष मुनोत, सेक्रेटरी – पंकज कोठारी, प्रोजेक्ट को – चेअरमन अभय यळरूटे, संजय खोत, नेमिनाथ कोथळे, प्रकाश गौड, रविंद्र नाकील, वसंत पाटील, महेंद्र मुथा, सुशिल माहेश्वरी, शरद देसाई, अजित कुरडे, पिरगोंडा (राजू) पाटील, संजय घायतिडक, सत्यनारायण धूत. विकम बुचडे श्रीनिवास दबडे आदी सदस्य उपस्थित होते.
१२० नाविन्यपूर्ण स्टॉल,आकर्षक गेम झोन.
दरवर्षी स्टॉल बुक करणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत यावर्षी नाविन्यपूर्ण इमिटेशन ज्वेलरी,इको फ्रेंडली मटेरियल,मातीची भांडी याचे स्टॉल असून फूड स्टॉल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशल स्टॉल दिलेले आहेत त्याचबरोबर ८० टक्के स्टॉल बुक झाले असून इच्छुकांनी त्वरित संपर्क साधून स्टॉल बुक करावेत असे आवाहन संयोजकांनी केले आहे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800