शाहीर विजय जगताप यांचे निधन
इचलकरंजी
इचलकरंजीच्या साहित्य,कला,सामाजिक, सांस्कृतिक ,राजकीय क्षेत्रामध्ये गेली पन्नास वर्षे कार्यरत असलेले ज्येष्ठ शाहीर विजय जगताप हे रविवार ता.२९ डिसेंबर रोजी पहाटे कालवश झाले.अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे संस्थापक सदस्य, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सदस्य, सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, अशा नामांकित संस्थेचे सदस्य असलेल्या शाहीर विजय जगताप यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शिवाजी विद्यापीठामध्ये शाहिरी अभ्यासक्रम प्रमाणपत्र कोर्स चालू केला होता .महाराष्ट्रातल्या तमाम शाहिरांचा परिचय करून देणारे पुस्तक त्यांनी लिहून त्याचे प्रकाशन केले.महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक खात्याचा पुरस्कार त्यांना मिळाला,भारत सरकारच्या वतीने फेलोशिप प्रबंधाचे संशोधन, अनेक शूरवीरांच्या क्रांतिकारकांच्या इतिहासाचे पोवाडे,समाज प्रबोधन पर गाणी लिहून पुस्तक स्वरूपात समाजासमोर ठेवला. इचलकरंजी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे माझी सभापती, शाहिरी व लोककला अकॅडमीच्या वतीने शाहिरी प्रशिक्षण शिबिर घेतली. व त्यातून अनेक शाहीर दोन ते तीन तासाचे स्वतंत्ररित्या शाहिरी कार्यक्रम करू शकतात असे शाहीर घडविले.सर्व क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा होता.
त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम मंगळवार दि.३१ डिसेंबर २४ रोजी सकाळी ८.३० वाजता इचलकरंजी पंचगंगा नदी घाटावर आहे.
तसेच सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने शाहीर विजय जगताप यांना आदरांजली वाहणारी शोकसभा गुरुवार ता.२ जानेवारी २०२५ रोजी सायं. ४ वाजता समाजवादी प्रबोधिनी येथे होणार आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800