कोल्हापूरात विमानतळ झाल्याने जिल्ह्याचा विकास-संजय घोडावत यांचे रोटरी ट्रेड फेअरच्या शुभारंभाप्रसंगी प्रतिपादन.
इचलकरंजी:
दैनिक महासत्ता माध्यम प्रायाजित व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने गेली २४ वर्षे भरवत असलेल्या रोटरी ट्रेड फेेअरमुळे नवीन उद्योजकांना संधी मिळून परिसराचा विकास होतो. रोटरी ट्रेड फेअर हा उपक्रम लोकोपयोगी आहे, असे गौरवोद्गार उद्योगपती संजय घोडावत यांनी काढले.
येथील स्टेशन रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, केएटीपी ग्राऊंडवर दैनिक महासत्ता माध्यम प्रायोजित व रोटरी क्लब यांच्या सहकार्याने २ जानेवारी ते ६ जानेवारी अखेर भरविण्यात आलेल्या रोटरी ट्रेड फेअरचचे उद्घाटन संजय घोडावत यांच्या हस्ते व आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली शानदार कार्यक्रमात पार पडले. या कार्यक्रमप्रसंगी उद्योगपती संजय घोडावत बोलत होते. ते पुढे म्हणाले, रोटरी क्लबचे कार्य समाजोपयोगी आहे. विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपतात. या उपक्रमांना सर्वांनीच सहकार्य करावे, असे आवाहन केले. जोपर्यंत पायाभूत सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत परिसराचा विकास होत नाही. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून कोट्यवधींचा कर शासनाला जातो. परंतु, म्हणावा तसा जिल्ह्याचा विकास झालेला नाही. परंतु कोल्हापुरामध्ये विमानतळ झाल्याने जिल्ह्यात विकास होऊ लागला असल्याचे नमुद केले. रोटरी क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमाला आपले नेहमीच सहकार्य राहिल, अशी ग्वाही शेवटी श्री. घोडावत यांनी दिली.
आयुक्त ओमप्रकाश दिवटे आपल्या मनोगतात, विविध उपक्रम राबवून निधी संकलन केला जातो. त्यातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात, अशा समाजोपयोगी कार्यक्रमास आपले सातत्यपूर्ण सहकार्य असते. रोटरीच्या विविध सामाजिक उपक्रमामधून एक सामाजिक चळवळ उभी राहिली आहे. भविष्यात महानगरपालिकेच्या माध्यमातून रोटरीने उपक्रम राबवावे त्यासाठी रोटरीने प्रस्ताव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून रोटरी ट्रेड फेअरचे उद्घाटन केले. उपस्थितांचे स्वागत रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक रोटरी ट्रेड फेअरचे चेअरमन मनिष मुनोत यांनी केले. त्यामध्ये त्यांनी ट्रेडफेअरचा इतिहास सांगून यंदाचा ट्रेड फेअर कशा पध्दतीने भरविला आहे, हे सांगितले. तसेच ट्रेड फेअरला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी रोटरीचे उपप्रांतपाल यतीराज भंडारी, रो. डॉ. प्रशांत कांबळे, रो. चंद्रकांत मगदूम, सौ. निलिमा दिवटे, दैनिक महासत्ताचे चंद्रकांत मिठारी, तानाजी हराळे, श्रेणिक मगदूम, सुनिल नवाळ, पंकज कोठारी, अभय यळरुटे, विठ्ठलराव डाके, रविंद्र सौंदत्तीकर, नेमिनाथ कोथळे, सत्यनारायण धूत, संजय खोत, विक्रम बुचडे, वसंत पाटील, महेंद्र मुथा, स्वाती सातपुते, सन्मती पाटील, सौ. मनाली मुनोत आदी पदाधिकारी उपस्थित होते. आभार संजय घायतिडक यांनी मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800