महानगरपालिकेकडे उपलब्ध झालेल्या नवीन ४ ट्रॅक्टरचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पुजन
इचलकरंजी
महाराष्ट्र शासनाकडून इचलकरंजी महानगरपालिकेस घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा करणेकामी पॉवरट्रॅक ४३९ डी.एस. ई.- २१ या कंपनीचे ४ ट्रॅक्टर मिळालेले आहेत.
आज बुधवार दि.८ जानेवारी रोजी सदर ट्रॅक्टरचे पूजन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे तसेच उपायुक्त प्रसाद काटकर आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते यांच्या हस्ते महानगरपालिका प्रांगणात करणेत आले .
यावेळी सहा.आयुक्त रोशनी गोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा. आयुक्त विजय राजापुरे, सहा .संचालक नगररचना प्रशांत भोसले, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, प्रशासन अधिकारी इरफान पटेल,प्र.विद्युत अभियंता इसरार बेग, क्रीडा अधिकारी संजय शेटे, प्र.वाहन अधिक्षक प्रशांत आरगे, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, सुभाष आवळे, अनिल कांबळे यांचेसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800