कन्या महाविद्यालयात उद्योजकतेची कौशल्ये व तंत्रे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत, “उद्योजकतेची कौशल्य व तंत्रे”, या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते माननीय प्रा. श्री चेतन गोडबोले ( निलया फाऊंडेशन , पुणे ) हे होते
हे होते. त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, यशस्वी उद्योजक होण्यासाठी नुसते कौशल्ये अंगी असून चालत नाही तर नेतृत्व करण्याची क्षमता, संयम आणि धोका पत्करण्याची मानसिक तयारी असावी लागते, असे मत व्यक्त केले, वाणिज्य शाखेतून व्यवसाय व उद्योजकतेच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे हे होते. विद्यार्थिनींनी उद्योजकतेची कौशल्य आणि तंत्रे आत्मसात करून छोटे-मोठे व्यवसाय सुरू करावेत आणि स्वतःच्या पायावरती उभे राहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संतोष बोराटे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शाहीन फकीर व प्रा. ओंकार कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा.निकिता बडे यांनी मानले. यावेळी अग्रणी विभागाच्या समन्वयक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.वर्षा पोतदार व प्रा.प्रिया सुतार उपस्थित होत्या.
या कार्यशाळेकरता अग्रणी महाविद्यालय योजनेतील सहभागी सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थी -विद्यार्थिनी, प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वाटप प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800