आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयातील विद्यार्थीनीची ग्रंथालय अभ्यास भेट.
एएससी महाविद्यालय, इचलकरंजी आणि कन्या महाविद्यालय इचलकरंजी मराठी विभाग यांच्यामध्ये झालेल्या अनुबंध कराराअंतर्गत ही भेट आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थिनींना ग्रंथालयाची ओळख व्हावी, ग्रंथालयामध्ये असणारी विविध ग्रंथसंपदा याची ओळख व्हावी, या हेतूने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थिनींनी पुस्तकाशी मैत्री केली पाहिजे, जास्तीत जास्त पुस्तके वाचली पाहिजेत,आपल्या सर्वांगीण विकासामध्ये पुस्तकांचे योगदान मोलाचे आहे, याशिवाय नवीन पुस्तके,नवीन ग्रंथ,अध्यायावत ग्रंथालय प्रणाली याची माहिती ग्रंथपाल माननीय श्री विजय यादव यांनी दिली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रतिभा पैलवान यांनी केले. यावेळी प्रा.संभाजी निकम,प्रा.गिरीश झुरळे,प्रा.शुभांगी नाकील उपस्थित होते.आभार कु.सारिका वाघमोडे हिने मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800