कार खरेदीच्या बहाण्याने २०.५० लाखांची फसवणूक
इचलकरंजी (ता. हातकणंगले) : कार खरेदीसाठी करार करून धनादेशाद्वारे रक्कम देण्याचे आश्वासन देत २०.५० लाख रुपये किंमतीची गाडी लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रतीक संतोष मालु (वय ३०, व्यवसाय – पेट्रोल पंप मालक, रा. कागवाडे मळा, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अमरजीत अशोक घाट (रा. विकासनगर, इचलकरंजी) याने किया कंपनीची MH-09-FQ-0084 क्रमांकाची मोटरकार खरेदीसाठी २०,५०,०००/- रुपयांचा करार केला. करारानुसार, आरोपीने ५ लाख रुपये रोख दिले, तर उर्वरित १५,५०,०००/- रुपये बँकेच्या कर्जात भरण्याचे कबूल केले.
गाडी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने बँक ऑफ बडोदाच्या दोन धनादेशाद्वारे रक्कम देण्याचे कबूल केले, मात्र त्याने आपल्या खात्यावर योग्य रक्कम जमा न केल्यामुळे दोन्ही धनादेश वटले नाहीत. फिर्यादीने पैसे किंवा गाडी परत मागितली असता, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत गाडी परत न देता फसवणूक केल्याचे उघड झाले.यावरून फिर्यादीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800