इचलकरंजी महानगरपालिका घरफाळा वसुली मोहीम तीव्र,२ मिळकती सील
इचलकरंजी : (प्रतिनिधी) – इचलकरंजी महानगरपालिकेच्या कर विभागातर्फे प्रलंबित घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. विशेष वसुली पथकांकडून थकबाकीदार मिळकतींवर कठोर कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या वतीने घरफाळा थकबाकीपोटी चंद्रकांत मोळे (वार्ड क्र.१३ घर क्र.२५२) २,९०,३८३/- व मालुताई मगदूम (वार्ड क्र१३, घर क्र.९५१/७) १,१८,७८५/- यांच्या मिळकती सील करण्यात आल्या तर कलप्पा तनंगे (वार्ड क्र.१, घर क्र.३३२) – ₹३२,७७०/-,आप्पा लक्ष्मण आवळे (वार्ड क्र.१८ घर क्र. 52)-१,१२,०१३/-,तातोबा टाकळे (वार्ड क्र.१, घर क्र. ७०९) –१२,९७९/-,रामा म्हादू चांभार (वार्ड क्र.१, घर क्र.७१९) -२९,३३७/- यांचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले. महापालिकेने मुदतीत घरफाळा व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले असून, थकबाकीदारांवर पुढील कठोर कारवाईचा इशारा कर अधीक्षक अरिफा नुलकर यांनी दिला आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800