दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजमध्ये कार्यशाळा संपन्न.
इचलकरंजी
दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजी येथे शैक्षणिक वर्ष २०१५-२६ पासून बारावीनंतर पाच वर्षाचा व पदवीनंतर तीन वर्षाचा लॉ डिग्री कोर्स सुरू होत आहे .याकरिता महाविद्यालयाच्या वतीने MH-CET कार्यशाळेचे आयोजन केले. कार्यशाळेसाठी लाभलेले पहिल्या सत्रातील वक्ते प्रा.नरेंद्र शिंदे सर यांनी CET प्रवेशा संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले, तसेच दुसऱ्या सत्रासाठी लाभलेले वक्ते ॲड. प्रीती पटवा यांनी या सीईटीमध्ये लागणाऱ्या अभ्यासक्रमाची सखोल मार्गदर्शन, परीक्षेचे स्वरूप आणि तयारी कशी करावी या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये दत्ताजीराव कदम आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.एम. मणेर सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. तसेच प्रमुख व्यक्तींची ओळख डॉ.रूपाली सांभारे यांनी केले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.चंद्रानी बागडी यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन डॉ. वर्षा शिंदे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार ॲड. सोहेल रोहिले यांनी केले .या कार्यशाळेसाठी एकूण या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी फायदा होईल.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800