इचलकरंजीत बेकायदा गॅस पाईप साठी खोदाई,मनपा अधिकाऱ्यांची राजकीय दबावातून संशयास्पद भूमिका,कागदोपत्री दंड करून माफ केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत बेकायदा गॅस पाईप साठी खोदाई,मनपा अधिकाऱ्यांची राजकीय दबावातून संशयास्पद भूमिका,कागदोपत्री दंड करून माफ केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप.

इचलकरंजी-
 महानगरपालिका शहराच्या हद्दीत एच पी ऑईल गॅस प्रा. लि. ने नैसर्गिक गॅस पुरवठ्या साठी रस्त्यावर खोदाई चालू केली आहे. या साठी मनपा प्रशासनाचा परवाना घेतला नाही. या बाबतची तक्रार केल्यावर जेसीबी जप्तीच्या कारवाईचा आभास करण्यात आला आणि मनपाच्या उत्पन्न बुडविण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रविकिरण हुक्केरीकर यांनी दिली.
एच पी ऑईल गॅस कं.प्रा.ली.या मक्तेदार कंपनीला इचलकरंजी शहरात स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायू पाईप द्वारे नागरिकांना पुरवठा करण्यासाठी ४ डिसेंबर २०२० ला काम मिळाले आणि ५७ रस्त्यावरील २६.०४ कि.मी.खोदाई साठी कंपनीने ४ कोटी ३७ लाख ८८ हजार ८५० रु. भरले.या नंतर एक वर्षांनी म्हणजे ३० डिसेंबर २०२१ ला १६६ रस्त्यावर खोदाई साठी ६ कोटी १८ लाख ७८ हजार ३८ रु. भरले. यानंतर १९ मार्च २०२१ रोजी स्टेशन नाका ते संभाजी चौक या मार्गावर गॅस पाईप टाकण्या साठी परवाना मागणी केली. पैकी स्टेशन नाका ते अटलबिहाटी बाजपेयी चौक पर्यंत १५७० मीटर खोदाई साठी ३१ लाख ४३ हजार १४०रु. भरून घेतले. याच्या करारात १२० दिवस मुदत असून हा करार ३० डिसेंबर २०२१ ला झाला.पण प्रत्यक्ष काम झाले नाही तर आता फेब्रुवारी २२०५ मध्ये या कंपनीने मनपा ची कसलीही परवानगी न घेता शहराच्या सांगली रोड वर अचानक पणे खोदाई चालू केली. त्यांच्याकडे काहीच कागद पत्र नाही म्हणून मनपा कडे लेखी तक्रार केली असता उपायुक्तानी एका बांधकाम विभागप्रमुख  आणि अतिक्रमण विभागास कारवाई करण्याचे आदेश दिले.या नुसार एका जेसीबी सह टिकाव, खोरी आदी जप्त करुन अतिक्रमण विभागात ठेवले असे लेखी पत्र दिले व या रस्ता खोदाईच्या घटनेबाबत महानगर पालिका संबंधिता कडून नुकसान भरपाई भरून घेणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते मात्र कसलाही दंड भरून न घेता जेसीबी व साहित्य परत दिले. मुळात अतिक्रमण विभागाकडे हे साहित्य दिलेच नसून बनाव रचला गेला अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांनी आमच्याकडे कोणताही जेसीबी व साहित्य दिले नसल्याचे स्पष्ट केले.
ही बाब संशय निर्माण करणारी आहे. तसेच मनपा आणि शासन यांचा महसूल बुडविणारी घटना आहे. या मिलीभगत घडामोडी विरुद्ध कोल्हापूर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या कडे रितसर तक्रारी दाखल केली आहे.
विशेष म्हणजे बेकायदा खोदाई विरुध्द तक्रार करूनही थांबलेले काम पुन्हा बेकायदा चालू झाले.दंड केला नाही. परवानगी दिली नाही. मक्तेदार अगदी बिनधास्त पणे कसा काम करत आहे? यामागील गौडबंगाल काय?सामान्य नागरिकांना अशी सुविधा आणि लाभ दिला जातो काय? हा प्रश्न आहेच.कंपनी बेकायदा खोदाई करते आणि अधिकारी धुळफेक करतात? या मागे कोण कार्यरत आहे? पाईप लाईन साठी खोदाई आणि नागरिकांना गॅस जोडणी साठी पुन्हा खोदाई या साठीचा परवाना आणि भरून घेतलेल्या रक्कमेचे नेमके काय झाले? मनपा आयुक्त पदाचा पदभार घेतलेल्या आयुक्त पल्लवी पाटील याची चौकशी करून कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. अन्यथा या भ्रष्टाचारा विरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहे. अशी माहितीही हुक्केरीकर यांनी दिली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More